IPL 2022: IPL २०२२ मध्ये या खेळाडूंवर मोठा अन्याय! हंगामात एक सामना खेळण्यासाठीही तरसले 

IPL 2022
Updated May 14, 2022 | 11:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yash Dhull-Rajvardhan Hangargekar । आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ६० सामने खेळले गेले आहेत. यावेळी देखील नेहमीप्रमाणे काही युवा खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

These players have not played a single match in IPL 2022 so far 
IPL २०२२ मध्ये हे खेळाडू पहिल्या सामन्याच्या प्रतिक्षेत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ६० सामने खेळले गेले आहेत.
  • काही खेळाडू असे आहेत त्यांना अद्याप या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Yash Dhull-Rajvardhan Hangargekar । मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ६० सामने खेळले गेले आहेत. यावेळी देखील नेहमीप्रमाणे काही युवा खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र या हंगामात काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या खेळाडूमध्ये संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्याची क्षमता आहे, मात्र यांना अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यामध्ये एका विश्वचषक विजेत्या कर्णधाराचा देखील समावेश आहे. (These players have not played a single match in IPL 2022 so far). 

अधिक वाचा : मुंबईत स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

यश धुल (Yash Dhull) 

यश धुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंडर-१९ २०२२ चा विश्वकप जिंकला होता. या विश्वचषकानंतर यश धुल खूप चर्चेत आला होता. मात्र यश धुलला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अंडर-१९ विश्वचषक २०२२ नंतर रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना यश धुलने पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले होते. तो अजूनही आयपीएलच्या या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्याच्या प्रतिक्षेत आहे. 

मोहब्बद नबी (Mohammad Nabi) 

मोहब्बद नबी हे टी-२० क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. अफगाणिस्तानचा ऑलराउंडर मोहम्मद नबी यावेळी कोलकाताच्या संघाचा हिस्सा आहे. मात्र केकेआरच्या संघाने या दिग्गज खेळाडूला आतापर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. नबी हा टी-२० क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू आहे, त्याने आतापर्यंत ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये २३ च्या सरासरीने १,५१७ धावा केल्या असून ७४ बळी पटकावले आहेत. मोहम्मद नबीनेही आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत.

राजवर्धन हंगरेकर (Rajvardhan Hangargekar)

भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या राजवर्धन हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने IPL मेगा लिलावात मोठी रक्कम देऊन सामील केले. चेन्नईने राजवर्धन ला दीड कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण राजवर्धनला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. राजवर्धन आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी