IPL 2022 च्या प्ले ऑफमध्ये सगळ्यात आधी जागा मिळवतील या २ टीम्स

IPL 2022
Updated Apr 26, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gujarat Titans: IPL 2022मध्ये गुजरात टायटन्स खूपच शानदार कामगिरी करत आहे. तर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. मुंबईला सलग ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

ipl 2022
IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये सगळ्यात आधी जागा मिळवतील हे २ संघ 
थोडं पण कामाचं
  • गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे.
  • हैदराबादही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी दावेदार आहे. 
  • आयपीएल २०२२चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही.

Playoffs Race: IPL 2022चा(Ipl 2022) हा हंगाम खूपच शानदार पद्धतीने होत आहे. प्रेक्षकांना दररोज आयपीएलचे रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२२चा अर्धा हंगाम सरला आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहे. अशातच त्यांचे प्ले ऑफमध्ये(play off) जाणे निश्चित आहे. This 2 teams will reach in play off of ipl 2022

अधिक वाचा - ऋषी धवनने गोलंदाजी करताना घातला अ‍ॅन्टिक मास्क

टॉपमध्ये आहेत हे संघ

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल 2022मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. टीमने आयपीएल २०२२मध्ये ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. तर गोलंदाजीतही त चांगल्या पद्धतीने बदल करतोय. हार्दिकने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्याने ७ सामन्यात २९५ धावा केल्यात. संघाकडे शुभमन गिलसारखा सालामवीर आहे. मध्यम फळीमध्ये त्यांच्याकडे डेविड मिलर आणि अभिनव मनोहरसारखे फलंदाज आहेत. अशातच हा संघ प्लेऑफमध्ये सगळ्यात आधी आपले स्थान पक्के करू शकतो. 

हैदराबादने सलग ५ सामने जिंकले

सनरायजर्स हैदराबादची आयपीएल २०२२मधील सुरूवात खूपच खराब राहिली. त्यांना पहिल्या दोन सामन्यात सलग पराभवास सामोरे जावे लागले. मात्र त्यानंतर केन विल्यमसन्सच्या नेतृत्वात हैदराबादने धमाकेदार पुनरागमन करताना पुढील ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला. हैदराबादची गोलंदाजी मजबूत आहे. त्यांच्याकडे उमरान मलिक, अब्दुल समद आणि टी नटराजनसारखे गोलंदाज आहेत तर डेथ ओव्हर्ससाठी भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड आहेत. हैदराबादही प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी दावेदार आहे. 

अधिक वाचा - गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम महत्त्वाचे आहेत, वाचा सविस्तर

मुंबई बाहेर

आयपीएल २०२२चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. आयपीएल २०२२मध्ये मुंबईला सलग ८ सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. संघाला अद्याप विजयाची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबईला ३६ धावांनी पराभव सहन करावा लागला. मुंबई संघासाठी अनेक प्लेयर्सने खराब खेळ दाखवला मुंबई इंडियन्स संघाची गणती ही आयपीएलच्या यशस्वी संघामध्ये होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी