IPL 2022: या ३ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळायला हवी होती कमीत कमी एक संधी

IPL 2022
Updated May 23, 2022 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022च्या दहा संघामध्ये काही असे खेळाडू ज्यांना एकदाही संधी मिळाली नाही. मात्र काही असे खेळाडू आहेत ज्यांना कमीत कमी एक संधी मिळाली पाहिजे. हे तीन युवा खेळाडू आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 

ipl
या ३ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळायला हवी होती कमीत कमी एक संधी 
थोडं पण कामाचं
  • बाहेर गेलेल्या तीन संघांकडे असे खेळाडू होते ज्यांना कमीत कमी एक संधी मिळायला हवी होती
  • भले हे संघ स्पर्धेतून बाहेर गेलेत मात्र यातील तीन युवा खेळाडूंना संधी मिळाली नाही. 
  • आम्ही बोलत आहोत अर्जुन तेंडुलकर, यश धुल आणि राजवर्धन हंगरेकर यांच्याबद्दल.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामातील(Ipl 2022) लीग सामने संपले आहेत. आयपीएल २०२२मधील ७० सामने खेळवले गेलेत. चार संघांनी प्लेऑफसाठी(play off) क्वालिफाय केले आहे. तर ६ संघ स्पर्धेतून बाहेर गेलेत. बाहेर गेलेल्या तीन संघांकडे असे खेळाडू होते ज्यांना कमीत कमी एक संधी मिळायला हवी होती. भले हे संघ स्पर्धेतून बाहेर गेलेत मात्र यातील तीन युवा खेळाडूंना संधी मिळाली नाही. This 3 players shouil get minimum one chance for play

अधिक वाचा - विमानतळाच्या लगेज बेल्टवर पोहचली एक डेड बॉडी?

खरंतर, आम्ही बोलत आहोत अर्जुन तेंडुलकर, यश धुल आणि राजवर्धन हंगरेकर यांच्याबद्दल. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले होते तेव्हा यश धुलला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते. तर चेन्नई सुपर किंग्सने राजवर्धन हंगरेकरवर बोली लावली होती. अशातच हे तीन युवा खेळाडू होते जे आपली वेळ येईल यासाठी वाट पाहत होते. या संघांनी लीगमधील १४-१४ सामने खेळले मात्र या खेळाडूंना शेवटपर्यंत बेंचवरच बसवून ठेवले. 

सगळ्यात आधी बोलूया क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल. त्याला मुंबईने २० लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. मुंबईचे सर्व गोलंदाज आणि ऑलराऊंडर संघर्ष करत होते मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने त्याला संधी दिली नाही. इतकंच की तो नेट्समध्येही चांगली गोलंदाजी करत होता. त्याचे अनेक व्हिडिओही मुंबई इंडियन्सने शेअर केले होते. 

दुसऱ्या नंबरवर यश धुलचे नाव आहे ज्याने देशाला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून दिला होता. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही खेळला आणि यशस्वी झाला. मात्र दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची त्याला एकदाही संधी मिळाली नाही. इतकंच की जेव्हा संघाचे फलंदाज स्ट्रगल करत होते तेव्हा यश धुलला मात्र बेंचवर बसवून ठेवले होते. 

आयपीएल २०२२च्या आधी मानले जात होते की चेन्नई सुपर किंग्स दीपक चाहरच्या अनुपस्थितीत राजवर्धन हंगरेकरला संधी दिली जाईल मात्र रवींद्र जडेजांतर एमएस धोनीला कर्णधार बनवले गेले मात्र या खेळाडूला संधी मिळाली नाही. इतकंच की गोलंदाजीमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघर्ष करताना दिसला होता. 

हे ४ संघ पोहोचले प्लेऑफमध्ये

गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आयपीएल २०२२च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर तर दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. तिसऱ्या स्थानावर लखनऊ सुपर जायंट्स आहे तर आरसीबी चौथ्या स्थानावर आहे. 

अधिक वाचा - जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या बायकोवर बलात्कार

प्लेऑफचे सामने २४ तारखेपासून 

२४ मे पासून प्लेऑफचे सामने रंगणार आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी