IPL 2022 Playoffs: Gujarat Titans व्यतिरिक्त हे ३ संघ आहेत प्ले ऑफचे दावेदार

IPL 2022
Updated May 03, 2022 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL Playoffs: IPL 2022मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने शानदार खेळ करताना प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. गुजरातशिवाय तीन संघ असे आहेत जे प्लेऑफमध्ये दावेदार आहेत. 

tata ipl 2022
Gujarat Titans व्यतिरिक्त हे ३ संघ आहेत प्ले ऑफचे दावेदार 
थोडं पण कामाचं
  • लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल २०२२मध्ये शानदार कामगिरी करत आहे.
  • संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये खूपच शानदार खेळ करत आहे.
  • IPL 2022मध्ये सनरायजर्स हैदराबादची सुरूवात खराब राहिली.

मुंबई: आयपीएल २०२२चा(ipl 2022) हा हंगाम धमाकेदार होत आहे. प्रेक्षकांना दररोज कोणते ना कोणते चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल जगात सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सने(gujrat titans) शानदार खेळ करताना प्ले ऑफमधील(play off) आपले स्थान पक्के केले आहे. गुजरातशिवाय तीन संघ असे आहेत जे प्ले ऑफमध्ये आपली जागा बनवू शकतात. This 3 teams can reach in play off

अधिक वाचा - एका रात्रीत प्रसिद्ध व्हायचेय? या सोप्या उपायांनी होणार ग्रह

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल २०२२मध्ये शानदार कामगिरी करत आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वात आयपीएल २०२२मध्ये लखनऊ संघाने १० पैकी७ सामने जिंकलेत. संघाची फलंदाजी मजबूत आहे. त्यांच्याकडे लोकेश राहुल आणि क्विंटन डी कॉकसारखी जबरदस्त सलामीची जोडी आहे. ते कोणत्याही आक्रमणाला धारातीर्थी पाडू शकतात. मिडल ऑर्डरमध्ये त्यांच्याकडे आयुष बदोनी आहे. बदोनीने आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त खेळ केला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना ४ पैकी १ सामना जिंकावा लागेल. 

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये खूपच शानदार खेळ करत आहे. संघाने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत. भारतीय पिच नेहमीच स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरतात. या पिचवर जबरदस्त खेळ करण्यासाठी त्यांच्याकडे रवीचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल आहेत. फास्ट बॉलिंगमध्ये त्यांच्याकडे ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा आहे. राजस्थानकडे अनेक मॅच विनर्स प्लेयर्स आहेत. 

अधिक वाचा - बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीस १३ नाही होते २२ वर्षांचे

सनरायजर्स हैदराबाद

IPL 2022मध्ये सनरायजर्स हैदराबादची सुरूवात खराब राहिली. संघाला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर हैदराबादने धमाकेदार पुनरागमन करत त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले. संघाचे १० पॉईंट झाले आणि ते पॉईंट टेबलमध्ये ४थ्या स्थानावर आहेत. हैदराबादची सगळ्यात मोठी ताकद त्यांची गोलंदाजी आहे. त्यांच्याकडे उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी