या आहेत IPLच्या इतिहासातील सगळ्यात महागड्या ओव्हर्स, या गोलंदाजाने दिल्या होत्या ३७ धावा

IPL 2022
Updated Apr 05, 2022 | 18:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल इतिहासात अनेक फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करताना खूप धावा केल्या. मात्र आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात महागडी ओव्हर २०११मध्ये टाकण्यात आली होती. या ओव्हरमध्ये त्या गोलंदाजाने ३७ धावा दिल्या होत्या. 

ipl
या आहेत IPLच्या इतिहासातील सगळ्यात महागड्या ओव्हर्स 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलमधील ३ सगळ्यात महागड्या ओव्हर्स
  • या गोलंदाजाने दिल्या १ ओव्हरमध्ये ३७ धावा
  • आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब गोलंदाजी 

मुंबई: आयपीएलमध्ये(ipl) दरवर्षी हायस्कोरिंग सामना पाहायला मिळतो. या हंगामातही आपण एका डावात २००हून अधिक धावा झालेल्या पाहत आहोत आणि इतका मोठा स्कोर चेसही होताना दिसत आहे. या लीगमध्ये दरवर्षी एकापेक्षा एक सरस विस्फोटक फलंदाज(batsman) खेळण्यास येतात आणि अनेक जबरदस्त खेळी करून साऱ्यांना हैराण करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ३ ओव्हर्सबाबत सांगत आहोत ज्यात फलंदाजाने खूप धावा केल्या आहेत. या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या ओव्हर्स ठरल्या आहेत. This are most expensive overs in ipl history

अधिक वाचा -राऊतांची ही कृती घोटाळ्यात सहभागी असल्याची कृती -सोमय्या

प्रशांत परमेश्वरन(२०११)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर २०११मध्ये फेकण्यात आली होती. ८ मे २०२२मध्ये आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोची टस्कर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होता. या सामन्यातील एका ओव्हरमध्ये ३७ धावा बनल्या होत्या. ही कामगिरी क्रिस गेलने केली होती. त्याने डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांत परमेश्वरनविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली आणि परमेश्वरनच्या एका ओव्हरमध्ये ४ षटकार आणि ३ चौकार लगावताना एकूण ३७ धावा केल्या. या ओव्हरमध्ये १ रन नो बॉलचाही होता. या ओव्हरमध्ये ६, नो बॉल आणि ६,४,४,६,६,४ धावा केल्या होत्या. सामन्यांत धावांचा पाठिलाग करताना गेलने ही जबरदस्त खेळी केली होती. 

हर्षल पटेल(२०११)

आयपीएल २०२१मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये ३६ धावा केल्या होत्या. जडेजाने आरसीबीच्या हर्षल पटेलविरुद्ध ही कामगिरी केली होती. जडेजाने या ओव्हरमध्ये ५ सिक्स आणि एक फोर ठोकला होता. या सामन्यात रवींद्र जडेजाने २२१.४३च्या स्ट्राईक रेटने केवळ २८ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या. त्याने त्याच्या या खेळीने चेन्नईचा स्कोर १९१ पर्यंत पोहोचवला होता. 

अधिक वाचा - कंगनाने ऑस्कर-ग्रॅमी पुरस्काराची उडवली खिल्ली

परविंदर अवाना(२०१४)

२०१४मध्ये आयपीएलमध्ये सुरेश रैनाने पंजाबचा गोलंदाज परविंदर अवानाच्या एका ओव्हरमध्ये ३३ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील तिसरी महागडी ओव्हर ठरली होती. २०१४च्या क्वालिफायर २मधील सामन्यात चेन्नईचा सामना किंग्स इलेव्हन पंजाबशी झाला होता. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. मात्र रैनाच्या धमाकेदार खेळीने साऱ्यांचे मन जिंकले होते. डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये परविंदर अवाना गोलंदाजीसाठी आला होता आणि सुरेश रैनाने त्याच्या ओव्हरमध्ये ३३ धावा ठोकल्या. या ओव्हरमध्ये रैनाने ५ फोर आणि २ सिक्स मारले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी