युझवेंद्र चहलने शेअर केला आयपीएल २०१३मधील किस्सा, क्रिकेटरने दारू पित त्याला १५व्या मजल्यावर लटकवले होते

IPL 2022
Updated Apr 08, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

युझवेंद्र चहल मस्ती करणारा एक खेळाडू आहे. मात्र त्याने आयपीएल २०१३मधील एक किस्सा शेअर केला आहे जेव्हा एक खेळाडू मस्तीच्या  भरात त्याचा जीव घेता घेता राहिला होता. तो त्यावेळेस मुंबईसोबत होता. 

yuzvendra chahal
क्रिकेटरने दारू पित त्याला १५व्या मजल्यावर लटकवले होते - चहल 
थोडं पण कामाचं
  • चहलने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की मी ही स्टोरी कधी सांगितली नाही.
  • मात्र आता लोकांना याबाबत समजले. ही २०१३मधील गोष्ट आहे
  • राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे यात अश्विन, चहलसोबत करूण नायरला घेऊन चर्चा करताना दिसत आहे.

मुंबई: टीम इंडियाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल दीर्घकाळापासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. २०१४मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याआधी मुंबई इंडियन्सचा भाग होता. चहल या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अश्विन आणि चहल दोघेही राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहेत. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे यात अश्विन, चहलसोबत करूण नायरला घेऊन चर्चा करताना दिसत आहे. या चर्चेदरम्यान चहलने एक धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितले की कसे २०१३मध्ये आयपीएलमध्ये त्याचा जीव वाचला होता. 

अधिक वाचा - राऊत शिवसेनेसोबत नाहीत; भाजपची टोमणा

चहलने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की मी ही स्टोरी कधी सांगितली नाही. मात्र आता लोकांना याबाबत समजले. ही २०१३मधील गोष्ट आहे. जेव्हा मी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आमचा एक सामना बंगळुरूमध्ये होता. सामन्यातनंतर एक गेटटुगेदर होते. तेथे एक खेळाडू होता जो दारूच्या नशेत होता मी त्याचे नाव घेणार नाही. तो खूपच दारूच्या नशेत होता. तो बऱ्याच काळापासून माझ्याकडे बघत होता. त्यानंतर त्याने मला बोलावले. 

अधिक वाचा - महाराष्ट्रात ८२८ कोरोना Active, आज १२८ रुग्ण, ६ मृत्यू

चहल पुढे म्हणाला, तो मला बाहेर घेऊन गेला आणि बाल्कनीतून त्याने मला लटकवले. माझे हात त्याच्या गळ्याभोवती होते. जर माझी हाताची ग्रिप सुटली असती तर...मी १५व्या मजल्यावर होतो. अचानक तेथे उपस्थित लोक आहे आणि त्यांनी संपूर्ण स्थिती सांभाळली. मी बेशुद्ध झालो होतो. मला लोकांनी पाणी दिले. त्या दिवसापासून मला समजले की आपल्याला बाहेर जाताना किती जबाबदार राहिले पाहिजे. ही अशी घटना होती ज्यामुळे माझा जीव थोडक्यात वाचला होता. थोडीशी चूक झाली असती आणि मी खाली पडलो असतो. 

चहलच्या पत्नीची सामन्यात अचानक एंट्री

खरंतर, राजस्थान रॉयल्सचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा एका सामन्यादरम्यान त्याला चीअर करण्यासाठी तेथे पोहोचली होती. धनश्री वर्मा पिंक टॉप आणि व्हाईट पँटमध्ये खूप सुंदर दिसत होती. सामन्यादरम्यान युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सेल्फी घेताना दिसली. धनश्री पती युझवेंद्रला चीअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये दिसते. ती पेशाने कोरिओग्राफर असून सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी