पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्समधून 'हा' परदेशी खेळाडू जाऊ शकतो बाहेर, दिग्गजांनी सांगितलं कारण

IPL 2021
भरत जाधव
Updated Apr 14, 2021 | 08:08 IST

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्राच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियान्सच्या संघाला पराभव स्विकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरुद्धात संघाला शेवटच्या षटकात पराभव मिळाला.

'This' foreign player may go out of Mumbai Indians next season
मुंबई इंडियन्समधून 'हा' परदेशी खेळाडू जाऊ शकतो बाहेर  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • मार्को जेन्सेन हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.
  • मार्को जेन्सेन हा १४३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो.
  • धिम्या गतीने गोलंदाजी केल्याने दिग्गज क्रिकेटर नाराज

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या १४ व्या सत्राच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियान्स (Mumbai Indians)च्या संघाला पराभव स्विकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)च्या विरुद्धात संघाला शेवटच्या षटकात पराभव मिळाला. या सामान्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेन्सेनच्या खेळाविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. तर भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेल (Parthiv Patel) यांनी तर या खेळाडूच्या मुंबई इंडियन्समधील भविष्याविषयीची चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान मुंबई इंडियन्सने आपल्या संघात ६ फूट ८ इंच उंची असलेला  दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जेन्सेनला घेतलं. मुंबईने पहिल्या सामन्यातील मुख्य खेळाडूंमध्ये मार्को जेन्सेन (Marco Jensen)चा समावेश करुन घेतला होता.  याविषयी न्युझीलंडचे माजी क्रिकेटर स्कॉट स्टाइरिस (Scott Styris) यांनी खेळाडू निवडीविषयी प्रश्न उपस्थित केला होता. मला वाटतं आहे की, हा खेळ खूप चांगला होता. मी आतापर्यंत त्याचा असा खेळ बघितलेला नव्हता.

तर भारताचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेल यांनीही मार्कोचा खेळ पाहिला आहे, त्याच्यासोबत राहिले आहेत. मार्को जेन्सेनच्या खेळाविषयी बोलताना पार्थिव पटेल म्हणाले की, 'मार्को हा फक्त आपल्या उंचीमुळे प्रभावशाली खेळाडू आहे असं नाही तर तो १४३ किमी/ प्रतितास या वेगाने गोलंदाजी करतो. जर चांगला बॉन्सर टाकायचा असला तर चेंडू अधिक वेगाने फेकला गेला पाहिजे. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबरचा सामना ज्या मैदानात झाला तेथील पिचवर मार्को जेन्सेनने धिम्या गतीने गोलंदाजी केली.

यामुळे मार्को जेनसनला यावेळी निवडणं हा मुंबई इंडियन्सचा निर्णय चुकला आहे'. 'मुंबई इंडियन्स मोठा पैसा लावून खेळाडू मैदानात उतरवत असते. अशात पुढील वर्षी लिलाव मोठा लागेल. मुंबई या संघाला मोठा पैसा लावून  मैदानात उतरवणार तर अशावेळी मार्को जेन्सेनला सोबत ठेवणं जरा कठिणचं वाटतं', अशी चिंता पार्थिव पटेल यांनी व्यक्त केली.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी