IPL च्या इतिहासात असं कधीच घडलं नाय, ते KKR ने करुन दाखवलं

IPL 2022
स्वप्निल शिंदे
Updated Apr 02, 2022 | 08:27 IST

IPL 2022, KKR vs PBKS: उमेश यादवने IPL-2022 च्या 8 व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध 4 विकेट घेतल्या. यासह त्यांनी इतिहास रचला आहे.

This has never happened in the history of IPL, KKR did it
IPL च्या इतिहासात असं कधीच घडलं नाय, ते KKR ने करुन दाखवलं  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्जचा (PBKS) 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.
  • उमेश यादवने मोडला विक्रम
  • पंजाबविरुद्ध 4 विकेट घेतल्या होत्या.

मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स (KKR) वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh yadav) पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 4 षटकात 23 धावा देऊन 4 बळी घेतले. यादरम्यान उमेश यादवने 1 मेडन ओव्हर टाकला. केकेआरच्या विजयात उमेशचा मोठा वाटा होता. यासोबतच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही इतिहास रचला आहे. उमेश यादव आयपीएल (ipl) मध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. (This has never happened in the history of IPL, KKR did it)

अधिक वाचा : IPL 2022: पहिल्यांदा चुकला धोनीचा निर्णय! हा खेळाडू बनला सीएसकेच्या पराभवासाठी जबाबदार

उमेश यादवने काही मिनिटांत सहकारी खेळाडूवर मात 

उमेश यादवने या बाबतीत आपल्याच संघातील सुनील नरेनचा मागे टाकले. नरेनने या सामन्यात लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला होता, ज्याने आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एकूण 31 विकेट घेतल्या होत्या, मात्र काही वेळाने उमेश यादवने त्याला मागे टाकले. हेही वाचा - आयपीएल 2022- पंजाबविरुद्ध उमेश यादवचा 'चौका', करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी आणि डोक्यावर सजवली पर्पल कॅप

अधिक वाचा : IPL 2022: एकच सामना खेळून संपले CSKच्या स्टार खेळाडूचे करिअर! आता संधी मिळणे कठीण

एकाच विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक आयपीएल विकेट

33 उमेश यादव विरुद्ध पंजाब किंग्ज
32 सुनील नरेन विरुद्ध पंजाब किंग्ज
31 लसिथ मलिंगा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
31 ड्वेन ब्राव्हो विरुद्ध मुंबई इंडियन्स
30 अमित मिश्रा विरुद्ध राजस्थान

अधिक वाचा : VIDEO: लखनऊ सुपर जायंटच्या फलंदाजाने खेळला भयानक शॉट, थोडक्यात बचावला फॅन

आंद्रे रसेलची झंझावात, केकेआरचा सहज विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव 18.2 षटकात केवळ 137 धावांवर आटोपला. पंजाबकडून भानुका राजपक्षेने 31 तर कागिसो रबाडाने 25 धावा केल्या. विरोधी संघाकडून उमेश यादवने 4 आणि टीम साऊथीने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात केकेआरने 14.3 षटकांत 6 गडी राखून विजय मिळवला. कोलकाताकडून अँड्र्यू रसेलने 31 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या, तर कर्णधार श्रेयस अय्यरने 15 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याचवेळी सॅम बिलिंग्सने पाचव्या विकेटसाठी 90 धावांची अखंड भागीदारी करत 24 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरला २, तर रबाडा आणि स्मिथला १-१ यश मिळाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी