Longest sixes in IPL: आयपीएलच्या इतिहासातील हे आहेत सर्वात लांब सिक्स

IPL 2022
Updated May 04, 2022 | 18:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंजाब किंग्सचा लियाम लिव्हिंगस्टोनने गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या बॉलवर हंगामातील सर्वात लांब षटकार ठोकला. हा षटकार ११७ मीटर दूर गेला. 

liam livingstone
आयपीएलच्या इतिहासातील हे आहेत सर्वात लांब सिक्स 
थोडं पण कामाचं
  • पंजाबने गुजरातला ८ विकेटनी हरवले
  • लिव्हिंगस्टोनने ठोकला ११७ मीटर लांब सिक्स

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2022  च्या हंगामात मंगळवारी पंजाब किंग्सने(punjab kings) आपला ५वा विजय साजरा केला. त्यांनी गुजरात टायटन्सला १६ ओव्हरमध्ये ८ विकेटनी हरवले. सामन्यात पंजाब टीमच्या लियाम लिव्हिंगस्टोनने(liam livingstone) हंगामातील सर्वात लांब ११७ मीटरचा षटकार ठोकत दिग्गजांनाही हैराण केले. दरम्यान चाहत्यांनी लियामच्या या सिक्सने हैराण होण्याची गरज नाही. कारण आयपीएल इतिहासात यापेक्षाही अधिक लांब सिक्स ठोकण्यात आले आहेत. 

अधिक वाचा - उर्फी जावेदला बलात्काराच्या धमक्या, इन्स्टा पोस्ट व्हायरल

लियामने १० बॉवलर ३० धावा ठोकल्या. त्याने या डावात ३ सिक्स आणि दोन चौकार ठोकले. या दरम्यान लियामने डावाच्या १६व्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या बॉलवर सिक्स ठोकला होता. त्याचा हा सिक्स ११७ मीटर दूर गेला आणि सरळ स्टँडमध्ये जाऊन पडला. 

२०२२च्या हंगामात सर्वाधिक लांब सिक्स मारणारे प्लेयर

लियाम लिविंगस्टोन  -  117 मीटर
डेवॉल्ड ब्रेविस -  112 मीटर
लियाम लिविंगस्टोन  -  108 मीटर
जोस बटलर     -  107 मीटर
लियाम लिविंगस्टोन  -  106 मीटर 

क्रिस गेलच्या नावावर सर्वात लांब सिक्स

लियामने या सिक्ससह आयपीएलच्या इतिहसातील दुसऱ्या सर्वात लांब सिक्सच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. याआधी २०१६च्या हंगामात बेन कटिंग्ने ११७ मीटर लांब सिक्स ठोकला होता. तेव्हा सनरायजर्स हैदराबादसाठी खेळताना कटिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा सिक्स ठोकला होता. आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१३च्या हंगामात आरसीबीसाठी खेळाना पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध ११९ मीटर लांब सिक्स ठोकला होता. 

अधिक वाचा - पतीपासून घटस्फोट घेऊन या अभिनेत्रींनी थाटला नवा संसार

आयपीएलच्या इतिहासातील लांब सिक्सर

क्रिस गेल  -  119 मीटर  - 2013 हंगाम
बेन कटिंग्स -  117 मीटर - 2016 हंगाम
लियाम लिविंगस्टोन- 117 मीटर - 2022 हंगाम
डेवाल्ड ब्रेविस- 112 मीटर  - 2022 हंगाम..
क्रिस गेल-  112 मीटर  -  2013 हंगाम
महेंद्र सिंह धोनी-  112 मीटर  -  2012 हंगाम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी