IPL 2022, KKR vs DC: कोलकाता-दिल्ली सामन्यादरम्यान या मिस्ट्री गर्लचा जलवा

IPL 2022
Updated Apr 11, 2022 | 18:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 मध्ये दररोज रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने एकतर्फी रंगलेल्या सामन्यात केकेआरला ४४ धावांनी हरवले. या सामन्यानंतर एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होत आहे. 

mystery girl
IPL 2022: KKR vs DC सामन्यादरम्यान या मिस्ट्री गर्लचा जलवा 
थोडं पण कामाचं
  • दिल्ली कॅपिटल्सने मिळवला विजय
  • व्हायरल होतोय या मिस्ट्री गर्लचा फोटो
  • श्रेयस अय्यरने खेळली मोठी खेळी

मुंबई: IPL 2022मध्ये प्रेक्षकांना आता दररोज रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने  (Delhi Capitals) ने कोलकाता नाईट रायडर्स(kolkata knight riders) संघाला ४४ धावांनी हरवले. या सामन्या दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवने(kuldeep yadav) जबरदस्त खेळ केला. मात्र सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. This mystery girl photo viral on social media on KKR vs DC in IPL 2022

अधिक वाचा - खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे क्रिकेटला करणार रामराम?

व्हायरल झाला हा फोटो

कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पाहत असलेल्या मिस्ट्री गर्लचा एक फोटो कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला. या मिस्ट्री गर्लचा फोटो कॅमेऱ्यात तेव्हा कैद झाला जेव्हा उमेश यादवला आऊट करण्यासाठी आपल्याच बॉलवर कुलदीप यादवने शानदार कॅच पकडला होता. दरम्यान, सुरूवातीला हे माहीत नव्हते की सफेट टॉप घातलेली ही मुलगी कोण आहे. मात्र नंतर समजले की ती अभिनेत्री आरती बेदी आहे. ट्विटरवर चाहत्यांनी आरतीला आयपीएल २०२२ची नवी मिस्ट्री गर्ल म्हणून घोषित केले आहे. 

कुलदीपच्या ४ विकेट

कुलदीप यादवने सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार ओव्हरच्या कोट्यादरम्यान ३५ धावा देत ४ विकेट मिळवल्या. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला. कुलदीप स्लो वेगाच्या गोलंदाजीवर विकेट मिळवल्या. 

अधिक वाचा - Belly Fat कमी करण्यासाठी घरातील या चार गोष्टी करतील मदत

दिल्ली कॅपिटल्सचा विजय

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, कर्णधार ऋषभ पंत, अक्षऱ पटेल आणि शार्दूल ठाकूर यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २० ओव्हरमध्ये पाच बाद २१५ धावा केल्या. कोलकातासाठी कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ५४ धावांची खेळी केली. कोलकाताचा संपूर्ण संघ १७१ धावांवर बाद झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी