IPLमध्ये १ ही सामना न खेळता दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला हा खेळाडू, नाव ऐकून व्हाल हैराण

IPL 2022
Updated Jun 01, 2022 | 13:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022: आयपीएल २०२२ची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्समध्ये एक खेळाडू असा होता ज्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. 

gujrat titans
IPLमध्ये १ ही सामना न खेळता दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • गुजरात टायटन्स संघाने एकूण ८ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेतले होते.
  • या स्क्वॉडमध्ये वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर डॉमिनिक ड्रेक्सही सामील होता.
  • डॉमिनिक ड्रेक्सला गुजरातने १.१० कोटींना खरेदी केले होते. मात्र त्याला एकदाही प्लेईंग ११मध्ये जागा मिळाली नाही.

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामाचा चॅम्पियन गुजरात टायटन्सने हंगामाआधी २३ खेळाडूंची एक टीम तयार केली होती. या टीमने संपूर्ण हंगामात शानदार खेळ दाखवला आणि आयपीएल २०२२चा खिताब आपल्या नावे केला. गुजरात टायटन्सच्या संघात एकापेक्षा एक सरस मॅचविनर खेळाडूंचा भरणा होता मात्र तुम्हाला ऐकून हैराणजनक वाटेल की टीममध्ये असा एक खेळाडू होता जो सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. 

अधिक वाचा - तीन हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात ३५ भुयारे

१ही सामना न खेळता बनला चॅम्पियन

गुजरात टायटन्स संघाने एकूण ८ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेतले होते. या स्क्वॉडमध्ये वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर डॉमिनिक ड्रेक्सही सामील होता. डॉमिनिक ड्रेक्सला गुजरातने १.१० कोटींना खरेदी केले होते. मात्र त्याला एकदाही प्लेईंग ११मध्ये जागा मिळाली नाही. खास बाब म्हणजे डॉमिनिक ड्रेक्स गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. तेथेही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र तेव्हाही त्याची टीम चॅम्पियन बनली होती. 

सॅम कुरेनच्या जागी मिळाली होती संधी

आयपीएल २०२१मध्ये इंग्लिश ऑलराऊंडर सॅम कुरेन दुखापतग्रस्त झाल्यानंतर डॉमिनिक ड्रेक्सला रिप्लेसमेंट म्हणून ठेवण्यात आले होते. आयपीएल सामन्यादरम्यान कमरेला झालेल्या दुखापतीमुळे सॅम करन आयपीएल सामन्यांशिवाय आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधूनही बाहेर पडला होता. डॉमिनिक ड्रेक्स त्या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून आला होता. 

वेस्ट इंडिज संघात मिळाले स्थान

चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग बनल्यानंतर डॉमिनिक ड्रेक्सला वेस्ट इंडिज संघात स्थान मिळाले होते. डॉमिनिक ड्रेक्सने वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ११.०६च्या इकॉनॉमीने ३ विकेट आणि ९ धावा केल्यात. डॉमिनिक ड्रेक्सने आतापर्यंत एक फर्स्ट क्लास, २५ लिस्ट एक आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत.  

अधिक वाचा - 'कल हम रहे न रहें कल... गाणे गात केकेनं घेतला जगाचा निरोप

गुजरातच्या संघाला मिळाले २० कोटी

आयपीएल २०२२ चा किताब जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाला ट्रॉफीसोबत २० कोटी रूपयांचे बक्षीस देण्यात आले. एवढीच रक्कम मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला देखील दिली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी