मुंबई: आयपीएल २०२२च्या(ipl 2022) सुरूवातीला मेगा लिलावाचे(mega auction) आयोजन करण्यात आले होते आणि खेळाडूंनाही रिटेन करण्यात आले होते. या वर्षी लिलावामुळे सर्व संघ बदलले. हे काही संघासाठी फायदेशीर ठरले तर काही संघांनी हंगामाच्या सुरूवातीला घेतलेले निर्णय त्यांना खूपच महागात पडले. आज आम्ही तुम्हाला अशा गोलंदाजाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या एका विकेटची किंमत तब्बल ३.२ कोटी रूपये इतकी पडली. This player one wicket price is 3.2 crore in ipl 2022
अधिक वाचा - पुतिन यांच्या मृत्यू झाला का? परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत. मात्र यंदाच्या हंगामा दोन्ही संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंनी काहीच कामगिरी केली नाही. चेन्नईने हंगामाआधी एमएस धोनी, रवींद्र जडेजा,ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला रिटेन केले होते. रवींद्र जडेजाला सीएसकेने १६ कोटींना रिटेन केले होते. मात्र त्यांचा हा निर्णय साफ चुकीचा ठरला. जडेजाने संपूर्ण हंगामात केवळ ५ विकेट घेतल्या. अशातच त्याची एक विकेटही तब्बल ३.२ कोटी रूपयांना पडली.
आयपीएल २०२२च्या सुरूवातीआधी सीएसकेने रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. मात्र जडेजा या हंगामात कर्णधार म्हणून साफ अपयशी ठरला. त्याने खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली नाही. जडेजाने ८सामन्यांत संघाचे नेतृत्व केले होते यातील फक्त २ सामन्यांत विजय मिळाला. बाकी ६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला प्लेईंग ११मधूनही बाहेर करण्यात आले होते.
अधिक वाचा - प्रेमात एकनिष्ठ असूनही या लोकांना अनेकदा मिळतो धोका
एकीकडे रवींद्र जडेजा सगळ्यात महागडा ठरला असताना दुसरीकडे त्याच संघातील गोलंदाज मुकेश चौधरीनेही मात्र कमाल केली. चेन्नईने मुकेशला २० लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. त्याने या हंगामातील १३ सामन्यांमध्ये १६ विकेट मिळवलया. अशातच त्याच्या एका विकेटची किंमत १.२५इतकी राहिली. मुकेश चौधरी याआधी चेन्नई सुपर किंग्ससाठी नेट बॉलरही राहिला आहे.