Mohammed Shami ची चाहती बनली ही पॉर्नस्टार, म्हणाली- मला वाटते तुझ्या प्रेमात पडलीये

IPL 2022
Updated Mar 31, 2022 | 12:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मद शामीने जबरदस्त कामगिरी केली. शमीच्या या खेळानंतर अमेरिकन पॉर्नस्टारने सोशल मीडियावर एक खास मेसेज लिहिला आहे. यावर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. 

mohammad shami
Mohammed Shami ची चाहती बनली ही पॉर्नस्टार 
थोडं पण कामाचं
  • शमीची चाहती बनली पॉर्नस्टार
  • सोशल मीडियावर लिहिला खास मेसेज
  • लखनऊविरुद्ध केली जबरदस्त कामगिरी

मुंबई: आयपीएल २०२२(ipl 2022)मध्ये यावेळेस १० संघ खेळत आहेत. जगभरातील ही लीग सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. आयपीएलचे चाहते जगभरात आहेत आणि सातत्याने आपल्या संघांना सपोर्ट करत असतात. यात मोठे मोठे खेळाडू सामील आहेत तर फिल्म स्टारही मागे राहत नाही. या हंगामातील चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स(gujrat titans) आणि लखनऊ सुपरजायंट(lucknow supergiants) यांच्यात खेळवण्यात आला. दोन्ही संघ आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळत होती यासाठी या सामन्यावरही साऱ्यांच्या नजरा होत्या.यात अमेरिकन अभिनेत्रीचाही समावेश आहे. यात सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीसाठी(mohammad shami) सोशल मीडियावर खास मेसेज केला आहे. This pornstar fan of mohammad shami

अधिक वाचा - यंदा या तारखेपासून होणार चैत्र नवरात्रीची सुरूवात

 

शमीची चाहती झाली ही पॉर्न स्टार

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात गुजरातला रोमहर्षक विजय मिळवला. गुजरातच्या विजयाचा हिरो ठरला मोहम्मद शमी. शमीने ४ ओव्हरमध्ये २५ धावा देत ३ विकेट मिळवल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच निवडण्यात आले. यातच अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्टही त्याच्या बॉलिंगची चाहती बनली आहे. केंड्रा लस्टने सोशल मीडियावर शमीसाठी खास मेसेज लिहिला आहे. केंड्रा लस्टने शमीला टॅग करत लिहिले, खूपच छान कामगिरी मोहम्मद शमी.

अधिक वाचा - फडणवीसांचे कट्टर विरोधक वकील सतीश उकेंच्या घरावर ईडीची धाड

कोण आहे केंड्रा लस्ट?

केंड्रा लस्ट ४३ वर्षीय अमेरिकन पॉर्नस्टार आहे आणि अमेरिकेत प्रसिद्ध आहे. ती अॅडल्ट स्टार असण्यासोबतच दिग्दर्शकही आहे. ती वेबकॅम मॉडेलच्या रूपातही ओळखली जाते. केंड्राने २०२१पासून अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिला बॉलिवूडचीही खूप आवड आहे. केंड्रा लस्ट आधीही सलमान खान आणि शाहरूख खानसारख्या दिग्गज सिने स्टार्ससाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी