मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी(chennai super kings) आयपीएल २०२२(ipl 2022)ची सुरूवात ही काही वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल २०२२मधध्ये आपल्या सुरूवातीच्या दोनही सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवामुळे एका खेळाडूचे आयपीएल करिअर(career) संपण्याच्या मार्गावर आहे. या खेळाडूला आता आयपीएलमध्ये पुन्हा संधी मिळणे मुश्किल दिसत आहे. This star csk player career finished after one match?
अधिक वाचा - पाॅर्न मूवी दाखवणं गणेश आचार्याला पडलं महागात
चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर डेवॉन कॉनवेला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर काढले होते. यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध या सामन्यात डेवोन कॉनवेला बाहेर काढण्यात आले होते. डेवोन कॉनवेच्या जागी मोईन अलीला संधी देण्यात आली होती. आता स्पर्धेतील इतर सामन्यांमध्येही मोईन अलीचे स्थान पक्के आहे.
या वर्षी आयपीएलच्या उऱलेल्या सामन्यांमध्ये मोईन अलीमुळे डेवोन कॉनवेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण वाटते. जर या संपूर्ण हंगमात चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवू शकला नाही तर त्याला पुढील वर्षी रिटेन केले जाणार नाह. अशातच या खेळाडूचे करिअर धोक्यात दिसतेय.
अधिक वाचा - गॅस सिलिंडर एका झटक्यात 250 रुपयांनी वाढ
चेन्नई सुपर किंग्सचा हा धाकड फलंदाजाने कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केवळ ३ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर काढण्यात आले. या सामन्यासाठी मोईन अली, ड्वेन प्रिटोरिय आणि मुकेश चौधरीला संघाल सामील केले होते.
लखनऊ सुपर जायंट्सला सामना जिंकवण्यासाठी १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या. चेन्नईकडून गोलंदाजी करण्यासाठी शिवम दुबे आला होता. तर लखनऊकडून इविन लुईस आणि आयुष बदोनी पिचवर होता. ओव्हर्च्या पहिल्या बॉलवरच आयुषने स्वीप शॉट खेळताना डीप स्क्वेअर लेगवर लांब सिक्स ठोकला. मात्र आयुषच्या या शॉटमुळे स्टँड्समध्ये बसलेली एक महिला दुखापतग्रस्त झाली. हा बॉल सरळ जाऊन एका महिला चाहतीच्या डोक्यावर बसला. त्यानंतर महिला बराच वेळ डोके पकडून बसली होती. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.