IPL 2022: या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी, हा कमकुवत संघ जिंकणार आयपीएलचा खिताब

IPL 2022
Updated Mar 31, 2022 | 20:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022मध्ये खूपच रोमहर्षक सामने खेळवले जात आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी एका टीमला आयपीएलचा विजयी दावेदार असल्याचे म्हटले आहे. 

tata ipl 2022
हा कमकुवत संघ जिंकणार IPLचा खिताब, दिग्गजाची भविष्यवाणी 
थोडं पण कामाचं
  • मॅथ्यू हेडनने केली मोठी भविष्यवाणी
  • IPL 2022चा खिताब जिंकणार हा संघ
  • सीएसकेने चार वेळा जिंकला आयपीएलचा खिताब

मुंबई: आयपीएल(ipl) ही जगात सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग(cricket league) आहे. येथे खेळल्यावर खेळाडूंना पैसा तसेच प्रसिद्धीही मिळते. आता याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने(matthew hayden) मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने आयपीएलमधील एका संघाला खिताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. This team can win ipl 2022 trophy says Matthew Hayden

अधिक वाचा - आघाडी करुन बनलेल्या सरकारला बिघाडीची कीड

या संघाला सांगितले विजयाचा प्रबळ दावेदार

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि महान खेळाडू मॅथ्यू हेडनने सांगितले, सीएसके संघ केकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवाने निराश होणार नाही. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात टीमसाठी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी होत्या. त्यांची टॉप ऑर्डर चालू शकली नाही. मात्र त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. मला विश्वास आहे की ते पुढील सामन्यात पुनरागमन करतील. त्याने पुढे सांगितले, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सीएसकेचा घातक ऑलराऊंडर मोईन अली खेळू शका नाही मात्र तो पुढील सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध असेल. 

यावेळेस कमकुवत आहे सीएसकेचा संघ

सीएसके संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आयपीएलचा खिताब जिंकला आहे. मात्र आयपीएल २०२२चा हंगाम सुरू होण्याआधी धोनीने सीएसकेचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. जडेजाकडे नेतृत्वाचा इतका अनुभव नाही. यावेळेस संघाची फलंदाजीची फळी कमकुवत दिसत आहे. त्यांच्याकडे फाफ डू प्लेसिससारखा सलामीवीर नाही. आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्यात सीएसकेला सुरेश रैनाची कमतरता जाणवली होती. शार्दूल ठाकूरही दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनला आहे. अशातच सांगता येऊ शकते की सीएसकेचा संघ संतुलित दिसत नाही आहे. 

अधिक वाचा - रवी राणा यांनी पोलीस आयुक्तांना तुरुंगात टाकण्याची दिली धमकी

केकेआरविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव

सीएसकेच्या संघाला आयपीएल २०२२मध्ये पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. ६ विकेटनी चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. केवळ महेंद्रसिंग धोनीने जबरदस्त खेळी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी