मुंबई: IPL 2022 च्या या हंगामातील सामने चांगले रोमहर्षक होत आहेत. प्रत्येक सामना चुरशीचा ठरत आहेत. प्रेक्षकही या सामन्यांची मजा घेत आहेत. आता इंग्लडचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू मायकेल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने आयपीएल २०२२चा खिताब जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे.
अधिक वाचा - Weight Loss Tips: वजन कमी करायचेय? खाण्यापिण्यात करा हे बदल
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खिताब जिंकू शकते. वॉनने भविष्यवाणी केली आहे की आरसीबी यंदा आयपीएल २०२२मध्ये आपल्या ७ पैकी ५ सामने जिंकत आपल्या खिताबाचा दुष्काळ संपवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आरसीबी सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
आरसीबीच्या संघाने रोमहर्षक सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला १८ धावांनी हरवले. यानंतर मायकेल वॉनने ट्वीट केले, यात कोणतीही शंका नाही की डुप्लेसिसच्या नेतृत्वात यावर्षी आरसीबी चांगली कामगिरी करेल. आरसीबी संघाने लखनऊच्या संघाला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले होते. लखनऊचा संघ २० ओव्हरमध्ये १६३ धावाच करू शकला.
Without doubt @RCBTweets are the real deal this year under @faf1307 !!! #IPL2022
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 19, 2022
अधिक वाचा - 'त्या' फवारणीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सामन्यात कमाल केली. डू प्लेसिसने सामन्यात ६४ बॉलमध्ये ९६ धावा केल्या. यात ११ चौकार आणि २ सिक्स मारले होतेत. त्याने ग्लेन मॅक्सवेलसह महत्त्वाची भागीदारी केली. डू प्लेसिसला त्याच्या खेळीमुळे मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड देण्यात आला. हेझलवूडने सामन्यात २५ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीसाठी कोणाकडेच उत्तर नव्हते.