IPL 2022: हिटमॅन रोहितची मुंबई इंडियन्स IPL मधून बाहेर? सलग सातव्या पराभवानंतर असा असेल मुंबईचा पुढचा रस्ता

IPL 2022
Updated Apr 22, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Indians IPL | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात खूप वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने आयपीएल २०२२ च्या हंगामात पहिले सलग ७ सामने गमावले आहेत.

This will be the next way for Mumbai Indians after the seventh defeat in a row
हिटमॅन रोहितची मुंबई इंडियन्स IPL मधून बाहेर?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली आहे.
  • मुंबईला सलग सातव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Mumbai Indians IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात खूप वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने आयपीएल २०२२ च्या हंगामात पहिले सलग ७ सामने गमावले आहेत. अशा स्थितीत हा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. (This will be the next way for Mumbai Indians after the seventh defeat in a row). 

लक्षणीय बाब म्हणजे मुंबई इंडियन्सच्या संघाला आपल्या आगामी ७ सामन्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच मुंबईच्या संघासाठी आगामी सर्व सामने 'करा किंवा मरा' असे असणार आहेत. मुंबईच्या संघाने पुढचे सर्व सामने जिंकले तरी हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल याची खात्री नाही.

अधिक वाचा : सभेला अद्याप परवानगी नाही,मनसे 'हा'निर्णय घेण्याच्या तयारीत

या हंगामातील मुंबईचे समीकरण 

मुंबई इंडियन्स संघ सध्या सर्व ७ सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात तळाशी म्हणजेच १० व्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या संघाला उर्वरित सर्व ७ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. असे झाले तरीदेखील संघ प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित मानले जाऊ शकत नाही. मुंबईच्या संघाने आगामी ७ पैकी एक सामना गमावला तर ६ सामने जिंकल्यानंतर त्यांचे केवळ १२ गुण होतील. अशा स्थितीत त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल. 

मुंबईच्या संघाला आतापर्यंत हे संघ वरचढ 

चालू हंगामात आतापर्यंत मुंबईच्या संघाने ७ सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आतापर्यंत हा संघ दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाला आहे.

मुंबईचे आगामी सामने

रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला या हंगामात आणखी ७ सामने खेळायचे आहेत. हे सामने लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध खेळायचे आहेत. 

चेन्नईने ३ गडी राखून मिळवला विजय

मुंबईचा शेवटचा सामना गुरूवारी चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५५ एवढ्या धावा केल्या. टिलक वर्माने ४३ चेंडूत ५१ धावा आणि सूर्यकुमार यादवने २१ चेंडूत ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने देखील सात गडी गमावून १५६ धावा केल्या आणि ३ बळी राखून विजय मिळवला. चेन्नई कडून अंबाती रायुडूने ३५ चेंडूत ४० धावा केल्या आणि रॉबिन उथप्पाने २५ चेंडूत ३० धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी