मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२२(india premier league 2022)चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला(mumbai indians) या हंगामात केवळ ४ विजय मिळवता आले. इतकंच नव्हे तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबईचा संघ पहिल्या स्थानावर होता. रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात संघाचा हा सगळ्यात खराब सीझन राहिला. मात्र मुंबईसाठी या हंगामात चांगली ठरलेली गोष्ट म्हणजे काही युवा फलंदाज तिलक वर्मा(tilak verma), टीम डेविड आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी आपल्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आणि संघाला आशा आहे की पुढील हंगामात तो चांगली कामगिरी करेल. tilak verma gave all IPL money to his father
अधिक वाचा - पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास तिलक वर्मा सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने पूर्ण हंगामात १४ सामन्यांमध्ये ३६च्या सरासरीने ३९७ धावा केल्या होत्या. तिलकचे कौतुक कोच महेला जयवर्धनेपासून ते कर्णधार रोहित शर्मानेही केले होते. तिलक लवकरच भारतीय संघासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल असेही तो म्हणाला होता.
मुंबई इंडियन्ससाठी आपल्या सर्व्हिस देण्याबदली त्याला १.७ कोटी रूपये मिळाले होते. तिलकने एका मुलाखतीत म्हटले की त्याला डिस्ट्रॅक्शनपासून वाचवण्यासाठी त्याने आयपीएलमध्ये मिळालेले सर्व पैसे आपल्या वडिलांना दिले होते. त्याने सांगितले, पैशांपासून डिस्ट्रॅक्ट होणे सोपे आहे यासाठी माझे सर्व पैसे आपल्या वडिलांना दिले आणि सांगितले की त्याला माझ्यापासून दूर ठेवा.
अधिक वाचा - IRCTC च्या पॅकेजसह करा थायलंडची स्वस्तात सहल
तिलक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि त्याचे वडील इलेक्ट्रिशियन आहे. त्याला आपल्या ट्रेनिंगसाठी जेवणही सोडावे लागले होते. दरम्यान तिलकला या पैशातून कार खरेदी करायची आहे. त्याला यासाठी कार खरेदी करायची आहे कारण त्याचा बसचा प्रवास वाचेल आणि तो आरामात ट्रेनिंगला जाऊ शकेल.