CSK vs RR, Playing XI, IPL 2021:आज राजस्थान-चेन्नईची टक्कर, पाहा कसे असू शकतात प्लेईंग ११

IPL 2021
Updated Apr 19, 2021 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chennai Super Kings vs Rajasthan Royals, Dream 11: चेन्‍नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आज आयपीएलच्या सामन्यात आमनेसामने येत आहेत. 

CSK vs RR
आज राजस्थान-चेन्नईची टक्कर, पाहा कसे असू शकतात प्लेईंग ११ 

थोडं पण कामाचं

  • आयपीएल २०२१मधील आजचा १२वा सामना
  • चेन्‍नई सुपर किंग्स वि राजस्थान रॉयल्स
  • धोनी ब्रिगेडसमोर राजस्थानचे आव्हान

मुंबई: आज आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स((CSK vs RR) यांच्यात १२वा सामना आज होत आहे. या सामन्यात एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ असणार आहे तर दुसरीकडे युवा कर्णधार संजू सॅमसनचा संघ असेल. या हंगामात एकदा याआधी ऋषभ पंतच्या रूपयात एका युवा कर्णधाराने अनुभवी धोनीच्या संघावर मात केली होती आणि यावेळी चेन्नई त्या पराभवाला विसरून पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. 

राजस्थान आणि चेन्नई, दोन्ही संघ आपला मागचा सामना जिंकून या सामन्यात उतरत आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. चेन्नईने गेल्या सामन्यात पंजाब किंग्सला हरवले होते तर राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सवर मात केली होती. चेन्नईकडून पंजाबविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या दीपक चाहरवर यावेळी नजरा असतील. राजस्थानच्या संघासमोर चाहरचे आव्हान असेल. 

या सामन्यात चाहर आणि राजस्थान यांच्यात खरा मुकाबला रंगेल. सॅमसननेही चांगली कामगिरी केली होती. राजस्थानला चेन्नईविरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल कारण जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांच्या अनुपस्थितीत त्यांची गोलंदाजी थोडी कमकुवत ठरू शकते. इंग्लंडचे हे दोन क्रिकेटर दुखापतीमुळे सामन्याबाहेर आहेत. त्यामुळे राजस्थान संघात काय बदल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग-11 (CSK probable playing XI)

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड़, दीपक चाहर, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, लुंगी एनगिदी, सैम करेन, रवींद्र जडेजा आणि मोइन अली. 

- राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग-11 (RR probable playing XI)

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), रियान पराग, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, डेविड मिलर, मनन वोहरा, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान आणि चेतन सकारिया. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी