IPL 2022: मुंबईसाठी आजचा सामना म्हणजे 'करो या मरो', अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

IPL 2022
Updated Apr 16, 2022 | 13:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

MI vs LSG Playing 11 | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या विजयाचे खाते देखील उघडू शकला नाही.

Today's match for Mumbai Indians is a do-or-die
मुंबईसाठी आजचा सामना म्हणजे 'करो या मरो'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • आजचा सामना मुंबई इंडियन्सविरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स आहे.
  • आज दुपारी ३.३० वाजल्यापासून सामना रंगणार आहे

MI vs LSG Playing 11 | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. मात्र यंदाचा आयपीएल हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघासाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या विजयाचे खाते देखील उघडू शकला नाही. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात आज दुपारी ३.३० वाजल्यापासून सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सध्या चमत्काराची गरज आहे कारण त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. (Today's match for Mumbai Indians is a do-or-die). 

अधिक वाचा : पाकिस्तान भारताविरूद्ध द्वेष पसरवण्यासाठी करतोय हे काम 

मुंबई विजयाचं खातं उघडणार? 

आयपीएल २०२२ मध्ये मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत आणि ते सर्व गमावले आहेत. मुंबईचा संघ लखनऊविरुद्धच्या सामन्यात आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुंबईने यापूर्वीही देखील असा चमत्कार करून दाखवला आहे. संघाने पहिले ६ सामने गमावून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्यामुळे रोहित ब्रिगेड या वेळी या सामन्याच्या आधीच्या सामन्याची पुनरावृत्ती करेल का हे पाहण्याजोगे असेल. 

अधिक वाचा : रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होईल

राहुल आर्मी गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर 

तर मुंबईच्या विरूद्ध आज लखनऊ सुपरजायंट्स आहे, ज्यांनी साजेशी कामगिरी केली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपरजायंट्सकडे फलंदाजीची मोठी ताकद आहे परंतु ते योग्यरित्या वापरण्यात अपयशी ठरले आहेत. लखनऊच्या संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. राहुल ब्रिगेडने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, त्यातील तीन जिंकले आहेत आणि आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. राहुलचा संघ आजच्या ११ व्या सामन्यात फारसा बदल करणार नाही मात्र मार्कस स्टॉइनिसच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे. 

मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची बाब म्हणजे त्यांचे स्टार खेळाडू शानदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. रोहित शर्मा, ईशान किशन, कायरन पोलार्ड यांची खेळी निराशाजनक राहिली आहे. जसप्रीत बुमराह गोलंदाजीत त्याच्या क्षमतेनुसार योगदान देताना दिसत नाही. मात्र, मुंबईच्या युवा खेळाडूंनी नक्कीच सर्वांना प्रभावित केले आहे. टिळक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. मुंबई इंडियन्सचा संघ बेसिल थम्पी, मुरुगन अश्विन यामधील कोणावर विश्वास दाखवेल हे पाहण्याजोगे असेल. तसेच टीम डेव्हिड किंवा फॅबियन ॲलन यांची टीममध्ये एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे.

 


दोन्ही संघाची संभावित प्लेइंग XI

मुंबई इंडियन्स - ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह आणि बेसिल थंपी.

लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, के गौतम, दुष्मंथ चमेरा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी