बोल्टचा राहुलला ४४० व्होल्टचा झटका, व्हायरल झाले अथिया शेट्टीची रिअॅक्शन

IPL 2022
Updated Apr 11, 2022 | 13:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकेश राहुल जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्याच बॉलवर त्याला राजस्थान रॉयल्सा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ४४० व्होल्टचा झटका दिला. लोकेश राहुल खाते न खोलताही बाद झाला. 

lokesh rahul - athiya shetty
बोल्टचा राहुलला ४४० व्होल्टचा झटका, अथिया शेट्टीची रिअॅक्शन 
थोडं पण कामाचं
  • व्हायरल झाले अथिया शेट्टीची प्रतिक्रिया
  • अनेकदा चर्चेत येते राहुल आणि अथिया शेट्टीचे नाव
  • लोकेश राहुल पहिल्याच बॉलवर झाला बोल्ड

मुंबई: लखनऊ सुपरजायंट्सचा(lucknow supergiants) कर्णधार लोकेश राहुल(lokesh rahul) जेव्हा रविवारी मुंबईच्या(mumbai) वानखेडे स्टेडियमवर(wankhede stadium) फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्याच बॉलवर राजस्थान रॉयल्सचा(rajasthan royals) वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला ४४० व्होल्टचा झटका देत क्लीन बोल्ड केले. लोकेश राहुल खाते न खोलता बाद झाला. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची मुलगी अथिया शेट्टी यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. trent bolt clean bold to lokesh rahul in ipl 2022

अधिक वाचा - ब्रह्मास्त्रच्या 'केसरिया' टीझर रिलीज

राहुलला बोल्टचा ४४० व्होल्टचा झटका

खरंतर, लोकेश राहुल आणि लखनऊ सुपरजायंट्सच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची मुलगी अथिया शेट्टी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आले होते. मिळालेल्या माहितीनुसार लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपरजायंट्सची सुरूवात खराब झाली. लोकेश राहुलला ट्रेंट बोल्टने खाते न खोलताच क्लीन बोल्ड केले. 

 

व्हायरल झाली अथिया शेट्टीटी प्रतिक्रिया

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा वेग आणि स्विंगसमोर लोकेश राहुलकडे काहीच उत्तर नव्हते. तो पहिल्याच बॉलवर आपली विकेट गमावून बसला. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर खूप निराश झाला आणि हा सामना पाहण्यासाठी आलेली त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचा चेहरा मात्र एकदम नाराज झाला. राहुल बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते विविध प्रकारचे ट्वीट्स करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी