मयंती लेंगरचे आयपीएल २०२०च्या बाहेर राहण्याचे कारण आले समोर, सोशल मीडियावरून दिली खुशखबर

IPL 2020
Updated Sep 19, 2020 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mayanti Langer: भारताची प्रसिद्ध क्रीडानिवेदिका मयंती लेंगर हिने सोशल मीडियावर एक खुशखबर देत सांगितले आहे की तिने यावर्षीच्या आयपीएलमध्ये भाग का घेतला नाही. जाणून घ्या मयंती लेंगरने काय म्हटले आहे.

Mayanti Langer
मयंती लेंगर  

थोडं पण कामाचं

  • मयंती लेंगरच्या यावर्षीच्या आयपीएलमधील गैरहजेरीचे खरे कारण आले समोर
  • मयंती लेंगर सहा आठवड्यांपूर्वी आई झाली आहे आणि ही खुशखबर तिने ट्वीट करून दिली आहे
  • मयंती लेंगर भारतातील सर्वात लोकप्रिय निवेदकांपैकी एक मानली जाते

नवी दिल्ली: भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडानिवेदकांपैकी (Famous sports anchor) एक असलेल्या मयंती लेंगरच्या (Mayanti Langer) यावर्षीच्या आयपीएलमधील गैरहजेरीचे (absence from IPL) खरे कारण (true reason) समोर आले आहे. मयंती लेंगरचे नाव यावर्षी आयपीएल २०२०च्या निवेदकांच्या पॅनेलवर (commentators’ panel) आले नाही तेव्हा चाहत्यांची चांगलीच (fans disappointed) निराशा झाली. पण आता मयंती लेंगरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (official twitter handle) सांगितले आहे की यावर्षी ती आयपीएलमध्ये का दिसणार नाही.

मयंती लेंगर सहा आठवड्यांपूर्वी आई झाली, ट्वीट करून दिली खुशखबर

मयंती लेंगर सहा आठवड्यांपूर्वीच आई झाली आहे. स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लेंगरने मुलाला जन्म दिला आहे. आयपीएलमधून माघार घेण्याच्या कारणाचा खुलासा करत मयंतीने लिहिले आहे, ‘आपल्यापैकी अनेकांना कळले तर काही जणांनी अंदाज बांधला. गेल्या पाच वर्षांपासून स्टार स्पोर्ट्सच्या परिवाराने मला काही हायप्रोफाईल कार्यक्रमांमध्ये सामील होण्याची संधी दिली. जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा अनेक तडजोडी केल्या गेल्या जेणेकरून मी पाचव्या महिन्यापर्यंत सहजपणे माझे काम करू शकेन. जर आयपीएलचा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे झाला असता तर मी जरूर दिसले असते. स्टुअर्ट बिन्नी आणि मी सहा आठवड्यांपूर्नी आमच्या मुलाचे स्वागत केले. आयुष्य चांगल्या गोष्टींसाठी बदलले आहे.’

हे आहेत यावर्षीच्या आयपीएलमधील निवेदक

तिने ट्विटरवर लिहिले, ‘मी आयपीएल पाहण्याचा आनंद लुटेन आणि माझ्या संपूर्ण टीमला आणि पूर्ण गँगला शुभेच्छा देते.’ याआधी जेव्हा आयपीएल २०२०च्या कमेंटेटर्सच्या यादीची घोषणा झाली होती तेव्हा यात अनेक दिग्गज नावे पुन्हा एकदा दिसली होती. हर्षा भोगले, सुनील गावस्कर आणि इयान बिशप यंदा ही जबाबदारी पार पाडतील तर ब्रेट ली, डीन जॉन्स, ब्रायन लारा, ग्रीम स्वान आणि स्कॉट स्टायरिस डगआऊट शोमध्ये दिसणार आहेत.

संयज मांजरेकरांचे नाव गायब

आयपीएल २०२०च्या कमेंटेटर्सच्या पॅनलमधून संजय मांजरेकर हे दिग्गज नाव यंदा गायब आहे. मांजरेकर यांनी बीसीसीआयला लिहिले आहे की ते माफी मागण्यासाठी तयार आहेत. माजी भारतीय गोलंदाज असलेल्या मांजरेकर यांनी खुलासा केला आहे की त्यांना कमेंटेटर्स पॅनलवरून यासाठी हटवण्यात आले आहे की काही खेळाडूंना त्यांच्यासह काही समस्या आहेत. बीसीसीआयला लिहिलेल्या ईमेलमध्ये लक्ष वेधत मांजरेकर यांनी म्हटले आहे की त्यांना पुन्हा कमेंटेटर्सच्या पॅनेलमध्ये सामील करून घेतले गेल्यास ते नियमांना धरूनच काम करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी