Umran Malik: उमरान मलिकच्या वेगाचा कहर, मयांकला लागला बॉल, मैदानावरच कोसळला

IPL 2022
Updated May 23, 2022 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल २०२२मध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकने १४ सामन्यांत एकूण २२ विकेट मिळवल्यात. उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे. 

umran malik
Umran Malik: उमरान मलिकच्या वेगाचा कहर, मयांकला लागला बॉल 
थोडं पण कामाचं
  • पंजाबने सनरायजर्सला ५ विकेटनी दिली मात
  • उमरान मलिकच्या बॉलवर दुखापतग्रस्त झाला मयांक

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2022च्या शेवटच्या लीग सामन्यात पंजाब किंग्सने(Punjab kings) सनरायजर्स हैदराबादला(sunrisers hyderabad) पाच विकेटनी मात दिली. वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यत आलेल्या सामन्यात सर्वांच्या नजरा उमरान मलिकवर(umran malik) होत्या. त्याची भारतीय टी-२०मध्ये निवड झाली आहे. उमरानने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत सामन्यात आपल्य वेगाचा कहर दाखवला. umran malik speedy ball injured mayank agrawal

अधिक वाचा - फरहान अख्तरच्या मेहुणीचे बोल्ड फोटोशूट

या दरम्यान उमरानचा एक बॉल पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अग्रवालच्या शरीरावर लागला. ही संपूर्ण घटना डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये घडली. या ओव्हरमध्ये उमरानने शाहरूख खानला बाद केले होते. यानंतर मयांक क्रीझवर आला होता. मयांकचे स्वागत उमराने शॉर्ट पिचवर बाऊंसने केले. मात्र पंजाबचा कर्णधाराला बॉल समजला नाही आणि त्याला बॉल लागला. मयांकने त्या बॉलवर कसेबसे लेग बायने एक धाव घेतली मात्र त्यानंतर तो मैदानावरच पडला. 

त्यानंतर फिजिओच्या उपचारानंतर मयांक उठून उभा राहिला. दरम्यान, दुखापतीनंतर मयांकचा आत्मविश्वास डळमळला होता आणि पुढल्याच ओव्हरमध्ये तो मोठा शॉट खेळण्याच्या नादात वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर जगदीशा सुचिथला कॅच देत बाद झाला. मयांक अग्रवालने चार बॉलचा सामना करताना केवळ एक धाव घेतली. 

असा होता सामना

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करत सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ८ बाद १५७ धावा केल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक ४३ आणि रोमारियो शेफर्डने नाबाद २६ धावांची खेळी केली. पंजाब किंग्सकडून हरप्रीत बराड आणि नाथन एलिसने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. 

अधिक वाचा - सीनाळा जंगलातील  सर्वात वयोवृद्ध वाघाचा मृत्यू

प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने २९ बॉल बाकी असताना १६० धावा करत लक्ष्य पूर्ण केले. लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद ४९ आणि शिखर धवनने ३९ धावांची खेळी केली. सनरायजर्सकडून फजलहक फारूकीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी