विराटने धोनीची स्तुती करत केले ट्वीट, नंतर केले डिलीट आणि...

IPL 2021
Updated Oct 11, 2021 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Praise MS Dhoni's Finishing Touch: चेन्नई आपल्या नेहमीच अंदाजात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या धोनीचे कौतुक करणारे ट्वीट कोहलीने केले. पाहा काय म्हणाला तो...

virat dhoni
विराटने धोनीची स्तुती करत केले ट्वीट, नंतर केले डिलीट आणि... 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये धोनीचा संघ झाला विजयी
  • धोनीचे कौतुक करताना केले ट्वीट
  • धोनीची खळी पाहून खुश झाला विराट

दुबई: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी नवव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. धोनीच्या आपल्या नेहमीच्या अंदाजात चेन्नईला विजय मिळवून दिला. 

६ चेंडूत चेन्नईला बनवायचे होते १३ रन्स

जिंकण्यासाठी दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने १९ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावत बनवले होते. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला १३ धावा हव्या होत्या. यावेळी स्ट्राईकवर मोईन अली होता. अशातच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने इंग्लंडचा युवा गोलंदाज टॉम कुरेनच्या हाती बॉल दिला. कुरेननेही आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. त्याने मोईन अलीला बाद केले. त्या दरम्यान स्ट्राईकवर धोनी आला. मोईन बाद झाल्यानंतर धोनीच्या चाहत्यांना अशी आशा होती की धोनी स्ट्राईकवर येईल आणि चेन्नईला विजय मिळवून देईल. 

धोनीने चौकार ठोकत मिळवला विजय

धोनीने असेच केले. त्याने तीन चेंडूवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. असे धोनीच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूच्या मिडविकेटच्या दिशेने विजयी चौकार ठोकला. चेन्नईच्या विजयानंतर सारेच नाचू लागले. 

विराटनेही ट्वीट करत केले कौतुक

अशातच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्वीट करत चेन्नईच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. विराटने धोनीचे कौतुक करताना घाईघाईत ट्वीट केले आणि लिहिले की किंग परत आलाय. जगातील सार्वकालीम आणि महान फिनिशिरने पुन्हा एकदा मला जागेवरून उठण्यास भाग पाडले. 

डिलीट करून पुन्हा केले ट्वीट

मात्र विराटने काही मिनिटानंतर आपले ट्वीट डिलीट केले. अशातच चाहत्यांना हा प्रश्न पडला की विराटने ट्वीट डिलीट का केले. मात्र हे सवाल आणखी येण्याअगोदर त्याने काही बदल करत पुन्हा ट्वीट केले. धोनीचे कौतुक करताना विराटने इतकी घाई केली की तो EVER लिहायला विसरला. त्याने पुन्हा आपली चूक सुधारत बदलासह नवीन ट्वीट केले. 

टी-२० वर्ल्डकपमध्ये असणार विराट आणि मेंटॉर धोनी

धोनी आणि विराट जरी आयपीएलच्या मैदानात प्रतिस्पर्धी असले तरी १७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दोघेही एकत्र दिसणार आहेत. धोनी मेंटॉर म्हणून विराट सेनेची मदत करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी