Virat Kohli: समांथा प्रभूच्या 'ऊ अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका; RCB च्या पार्टीत 'पुष्पा गर्ल'ची जादू

IPL 2022
Updated Apr 28, 2022 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Dance On Pushpa | तेलगु आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका असलेली संमाथा रूथ प्रभूचा आज वाढदिवस आहे. तिने प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. मात्र तरीदेखील तिचा चाहता वर्ग संपूर्ण देशभर आहे.

Virat holds dance on Samantha Prabhu's song 'Oo Antava '
समांथा प्रभूच्या 'ऊ अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • ग्लेन मॅक्सेवलच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निम्मिताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
  • या पार्टीमध्ये पुष्पामधील समांथाच्या 'ऊ अंटावा' गाण्याची जादू पाहायला मिळाली. 

Virat Kohli Dance On Pushpa | मुंबई : तेलगु आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका असलेली संमाथा रूथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) आज वाढदिवस आहे. तिने प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. मात्र तरीदेखील तिचा चाहता वर्ग संपूर्ण देशभर आहे. त्याचाच एक प्रत्यय म्हणजे यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' सिनेमानं हिंदीमध्येही लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. पुष्पामध्ये समांथाचे एक आयटम सॉंग प्रचंड गाजले. सध्या कोणत्याही पार्टीमध्ये ते गाणं जरूर वाजवले जाते. (Virat holds dance on Samantha Prabhu's song 'Oo Antava'). 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुच्या संघातील ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाला २७ एप्रिल २०२२ रोजी एक महिना पूर्ण झाला. त्यामुळे आरसीबीच्या खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये पुष्पामधील समांथाच्या 'ऊ अंटावा' गाण्याची जादू पाहायला मिळाली. 

अधिक वाचा : छेडछाड प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीला अद्याप दिलासा नाही


विराटने धरला ठेका 


या पार्टीमध्ये आरसीबीच्या संघातील सर्व खेळाडूंसह स्टाफ देखील सहभागी झाला होता. या पार्टीसाठी सर्वांनी खास भारतीय पोशाख परिधान केला होता. मात्र पार्टीचे आकर्षण ठरला तो आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली. विराटने या पार्टीत चांगलीच धमाल केली. विराटने काळा कुर्ता घालून सर्वांचेच लक्ष वेधले. तसेच त्याने पुष्पामधील 'ऊ अंटावा' गाण्यावर जोरदार डान्स केला. विराटच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RCB च्या खेळाडूंनी केले फोटो शेअर 

आरसीबीच्या वेगवेगळ्या खेळाडूंनी या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर या फोटोंची मोठी चर्चा रंगली आहे. कारण विराट कोहलीची पत्नी आणि अनुष्का शर्माने देखील तिच्या इंस्टाग्राम अकांउटवरून एक फोटो शेअर केला आहे.

यंदाचा आयपीएल हंगाम आरसीबीच्या संघासाठी खूप वेगळा आहे. कारण या हंगामात संघ एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळत आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत साजेशी कामगिरी केली आहे. साखळी सामन्यातील पहिल्या सात सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर सलग दोन सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध आरसीबीचा संघ केवळ ६८ धावांवर सर्वबाद झाला होता. ही धावसंख्या या हंगामातील सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने आरसीबीला पराभूत केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी