Watch:चौकार ठोकल्यानंतर कोहलीने पांड्यावर उगारले डोळे, तोंड लपवताना दिसला हार्दिक

IPL 2022
Updated May 20, 2022 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला आणि त्यावेळेस क्रीझवर विराट कोहली होता. 

virat kohli
Watch: चौकार ठोकल्यावर कोहलीने पांड्यावर उगारले डोळे 
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्याने यानंतर चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल विराट कोहलीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.
  • चौकार ठोकल्यानंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्याला आक्रमक पद्धतीने इशारा करत छेडायला सुरूवात केली
  • हार्दिक पांड्याच्या या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीने सलग २ चौकार ठोकले.

मुंबई: गुजरात टायटन्स (GT)विरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आपल्या जुन्या रंगात दिसला.  विराट कोहली (Virat Kohli) ने या सामन्यात ५४ बॉलमध्ये ७३ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) गुजरात टायटन्स (GT) चा कर्णधार हार्दिक पांड्याला डोळे उगारताना दिसला. virat kohli and hardik pandya video viral on social media

अधिक वाचा - ऐकलं का ! घरी बसूनही कमी करू शकतात तुमचं वजन

हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्यात अनबन

खरंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चौथ्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला आणि त्याववेळेस क्रीझवर विराट कोहली होता. हार्दिक पांड्याच्या या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीने सलग २ चौकार ठोकले. चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकल्यानंतर कोहली आणि पांड्या यांच्यात बाचाबाची झाली. 

विराट कोहलीने वटारले डोळे

हार्दिक पांड्याने यानंतर चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल विराट कोहलीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीने या बॉलवर जबरदस्त शॉट ठोकला. विराट कोहलीने या बॉलवर लेग स्क्वेअरच्या दिशेला सिक्स ठोकण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल तेथे उपस्थित फिल्डर रशीद खानच्या हाताला लागून चौकार गेला. 

अधिक वाचा - या नावाच्या मुली जन्मताच असतात भाग्यवान

तोंड लपवताना दिसला हार्दिक

चौकार ठोकल्यानंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्याला आक्रमक पद्धतीने इशारा करत छेडायला सुरूवात केली. विराट कोहलीची आक्रमकता पाहून हार्दिक पांड्या तोंड लपवताना दिसला. ट्विटर युझर सुशांत मेहताने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय काही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी