virat kohli: हरल्यानंतर खूप रडला विराट, डे विलियर्सलाही अश्रू अनावर

IPL 2021
Updated Oct 12, 2021 | 17:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

सामन्यातील पराभवानंतर संघाशी बोलताना विराट खूप रडला. त्याच्यासोबत डेविलियर्सही रडत होता.

virat kohli
virat kohli | हरल्यानंतर खूप रडला विराट, डे विलियर्सलाही अश्रू अनावर 

थोडं पण कामाचं

  • विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे.
  • एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याने बंगळुरूचा पराभव केला.
  • बंगळुरूच्या पराभवाने आरसीबीचे स्वप्न भंगले.

मुंबई: आयपीएल २०२१मध्ये मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनिटेर सामना रंगला होता. या सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आणि बंगळुरूचे आयपीएल खिताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवासोबतच बंगळुरूचा आयपीएलमधील प्रवास येथेच संपला. विराट कोहलीचाही कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना होता. सामन्यातील पराभवानंतर संघाशी बोलताना विराट खूप रडला. त्याच्यासोबत डेविलियर्सही रडत होता.

सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने ७ बाद १३८ धावा केल्या आणि १३९ धावांचे लक्ष्य केकेआरला दिले. मात्र कोलकात्याने ६ विकेटच्या नुकसानीवर हे आव्हान पूर्ण केले. जेव्हा कोहलीच्या संघाचा पराभव झाला तेव्हा तो मैदानातच रडू लागला. 

वडिलांच्या निधानानंतरही रडला नव्हता कोहली

कोहलीने अमेरिकन स्पोर्ट्स रिपोर्टर ग्राम बेनसिंगसोबत बोलताना सांगितले होते की, त्यावेळेस मी चार दिवसांचा सामना खेळत होतो आणि हे सगळ घडलं होतं. मला पुढल्या दिवशी फलंदाजी करायची होती. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते गेले. कुटुंबातील सगळेचजण कोसळले होते आणि रडायला लागले. मात्र माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. मला समजतं नव्हतं की काय झाले आहे. मी सुन्न होतो. 

विराट दुसऱ्या दिवशी बॅटिंगला उतरला आणि त्यानंतर ९० धावांची खेळी केली. यानंतर कोहलीला फार कमी वेळा रडताना पाहिले गेले. २०१६च्या आयपीएलमध्ये जेव्हा त्याचा संघ फायनलमध्ये पराभूत झाला होता तेव्हा तो भावूक झाला होता मात्र कर्णधारम्हणून अखेरच्या सामन्यात मिळालेल्या पराभवाने त्याला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.

विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितले. हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी