विराट कोहलीने नारायणसोबत केली मस्ती, म्हणाला 'कर मला बाद' - पाहा व्हिडिओ

IPL 2019
Updated Apr 25, 2019 | 12:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IPL 2019: शुक्रवारी रात्री बंगळुरू विरुद्ध कोलकाता या आयपीएलच्या सामन्यादरम्यान एक मजेदार बाब पाहायला मिळाली.

virat kohli
विराट कोहली  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: आयपीएल २०१९मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मैदानावर शुक्रवारी रात्री कोलकाता आणि बंगळूरुचा संघ आमनेसामने आला. या सामन्यात विराट कोहली दमदार खेळी करत आयपीएलच्या करिअरमधील पाचवे शतक ठोकले.  विराटने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला २१३ ही सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. याच्या प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला केवळ २० ओव्हरमध्ये ५ बाद २०३ धावाच करता आल्या. या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना एक मजेशीर प्रसंगही पाहायला मिळाला. 

किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्या झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यान अश्विनने मंकड विकेट पद्धतीने जोस बटलरला बाद केले होते. त्यानंतर याची जोरदार चर्चाही झाली होती. तेव्हापासून आयपीएलचे सर्व फलंदाज याबाबतीत सजग राहतात. यात आता विराट कोहलीचे नावही सामील झाले आहे. त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही अशीच मस्ती केली. 

सामन्यात जेव्हा विराट कोहली नॉन स्ट्राईक एंडजवळ उभा होता तेव्हा सुनील नारायण गोलंदाजी करत होता. त्यावेळी एका चेंडूवर विराट चेंडू फेकण्याआधीच पुढे सरकला होता. त्याचवेळी बॉलिंग करत असलेला नारायण थांबला. विराटने ते पाहताच तो लगेचच मागे आला आणि त्याने क्रीझच्या आत बॅट टेकवली. यावेळी त्याने नारायणच्या दिशेने इशारा करताना आता बाद करून दाखव असे सांगितले. 

पाहा मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ

 

 

कोलकाताकडून या सामन्यात नितीश राणाने ४६ चेंडूत ८५ धावा केल्या तर आंद्रे रसेलने २५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. कोलकाताने या सामन्यात विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. विराट कोहली आता सुरेश रैनाला मागे टाकत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
विराट कोहलीने नारायणसोबत केली मस्ती, म्हणाला 'कर मला बाद' - पाहा व्हिडिओ Description: IPL 2019: शुक्रवारी रात्री बंगळुरू विरुद्ध कोलकाता या आयपीएलच्या सामन्यादरम्यान एक मजेदार बाब पाहायला मिळाली.
Loading...
Loading...
Loading...