Virat Kohli IPL 2022: झुकलेले खांदे आणि संथ चाल, पॅव्हेलियनमध्ये असा निराश परतला कोहली

IPL 2022
Updated May 09, 2022 | 15:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: कोहलीने शॉर्ट मिडविकेट क्षेत्रात बॉलला फ्लिक करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र तो बॉलला टाईम करू शकला नाही. आऊट झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर हास्य दिसले कारण तो आपल्या विकेटने दंग झाला होता.

virat kohli
झुकलेले खांदे आणि संथ चाल, पॅव्हेलियनमध्ये निराश परतला कोहली 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सहाव्यांदा गोल्डन डकचा शिकार ठरला.
  • कोहलीच्या खराब फॉर्मचा अंदाज त्याच्या सध्याच्या बॅटिंग एव्हरेजवरून ठरवता येऊ शकतो.
  • आयपीएल २००८मध्ये त्याच्या डेब्यू सीझननंतर हा सगळ्यात खराब फॉर्म आहे.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) विराट कोहलीची(virat kohli) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या(surisers hyderabad) सामन्यात कोहली सामन्याच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा फलंदाज स्पिन गोलंदाज जगदीशा सुचिथने कर्णधार केन विल्यमसन्सच्या हाती कॅच देत त्याला बाद केले. virat kohli is in bad form in ipl 2022

अधिक वाचा - उन्हाळ्यात बडीशेपचे पाणी ठरू शकते घातक

कोहलीने शॉर्ट मिडविकेट क्षेत्रात बॉलला फ्लिक करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र तो बॉलला टाईम करू शकला नाही. आऊट झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर हास्य दिसले कारण तो आपल्या विकेटने दंग झाला होता. दरम्यान, ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर त्याने निराशेच्या भरात आपल्या डोक्यावर हात ठेवला. 

कोहलीला ड्रेसिंग रूममध्ये संघाचे हेड कोच संजय बांगड यांच्यासह काही बातचीत करताना पाहिले. त्या बातचीतदरम्यान संजय बांगड यांनी कोहलीच्या पाठीवर थापटत त्याला सात्वंना दिली. सोशल मीडियावर ही घटना खूप व्हायरल होत आहे.

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सहाव्यांदा गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्यांदा तीन गोल्डन डक त्याने २००८(मुंबई इंडियन्स), २०१४(पंजाब किंग्स) आणि २०१७(कोलकाता नाईट रायडर्स)मध्ये झाला होता. उरलेले तीन गोल्डन डक संध्याच्या सीझनमध्ये झाला. 

कोहलीच्या खराब फॉर्मचा अंदाज त्याच्या सध्याच्या बॅटिंग एव्हरेजवरून ठरवता येऊ शकतो. आयपीएल २००८मध्ये त्याच्या डेब्यू सीझननंतर हा सगळ्यात खराब फॉर्म आहे. आयपीएल २००८मध्ये विराट कोहलीने १३ सामन्यात १५च्या सरासरीने १६५ धावा केल्या होत्यात. तर २००९म्ये कोहलीने १६ सामन्यांत २२.३६च्या सरासरीने २४६ धावा केल्या होत्या. 

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आरसीबीच्या माजी कर्णधाराने आतापर्यंत २१९ आयपीएल सामन्यांमध्ये ६४९९ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये ५ शतके आणि ४३ अर्धशतके आहेत. 

अधिक वाचा - आज KKR चा खेळ बिघडवायला उतरणार मुंबई पलटन

कोहलीच्या आयपीएलमधील डेब्यूपासूनच आरसीबीचा भाग आहे. त्याने १४० सामन्यांमध्ये नेतृत्व आहे. विराटच्या नावावर आयपीएलच्या एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. विराटने २०१६मध्ये ८१.०८्या सरासरीने एकूण ९७३ धावा केल्या होत्या. यात ४ शतके आणि ७ अर्धशतकाचा समावेश होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी