मुंबई: चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यात बुधवारी पुण्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीचा(virat kohli) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी(ms dhoni) जेव्हा अवघ्या २ धावा करून बाद झाला तेव्हा विराट कोहलीच्या प्रतिक्रियेवरून लोक सवाल उपस्थित करत आहे.
अधिक वाचा - कडक उन्हामुळे तुमच्या पायांवर पडलेत काळे डाग?, वाचा सविस्तर
धोनी जसा रजत पाटीदारच्या हाती जोश हेझलवूडच्या बॉलवर बाद झाला तसे विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. व्हिडिओमध्ये तो ओठ खेचत असे हावभाव केले की ज्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावर विराटच्या या प्रतिक्रियावरून लोक त्याच्यावर टीका करत आहेत. काही लोक विचारतायत की विराटने शिवी दिली का?
This Cricket clown🤡 abusing Dhoni still some Mahirat Clowns are supporting this disgusting character 💦 pic.twitter.com/DX1Cm9k7O3
— Bruce Wayne (@Bruce_Wayne_MSD) May 4, 2022
असे काही पहिल्यांदाच झाले नाही जेव्हा विराट इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसला. तो भारताकडून खेळतानाही याच पद्धतीने आक्रमक दिसतो. धोनीसारखा महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आनंद व्यक्त करणे ही काही चुकीची गोष्ट नाही मात्र आपल्या चेहऱ्याच्या हावभावामुळ तो फसताना दिसतोय.
अधिक वाचा - तजिंदर पाल बग्गा यांना का अटक करण्यात आली, जाणून घ्या
आरसीबीच्या संघाने या सामन्यात चेन्नईला १३ धावांनी हरवले. आरसीबीने २० ओव्हरमध्ये १७३ धावा केल्या होत्या. तर चेन्नईचा संघ १६० धावा करू शकला. या सामन्यात हर्षल पटेलने आरसीबीसाठी जबरदस्त गोलंदाजी केली आणि संघासाठी तीन विकेट मिळवल्या.