अॅडलेड कसोटीनंतर विराट सुटीवर जाणार, रोहित खेळणार

Virat Take Paternity Leave After First Test Rohit Added To Squad ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात (टीम) निवड समितीने महत्त्वाचे बदल केले. रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश झाला.

Virat Kohli To Take Paternity Leave After First Test Against Australia Rohit Sharma Added To Squad Says Bcci
अॅडलेड कसोटीनंतर विराट सुटीवर जाणार, रोहित खेळणार 

थोडं पण कामाचं

 • अॅडलेड कसोटीनंतर विराट सुटीवर जाणार, रोहित खेळणार
 • संजू सॅमसनचा वन डे टीममध्ये समावेश
 • दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीला वगळले, टी. नटराजनचा टी ट्वेंटीसाठी समावेश

मुंबईः ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात (टीम) निवड समितीने महत्त्वाचे बदल केले. या बदलामुळे मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेनच्या कसोटी (टेस्ट) सामन्यांसाठी रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश झाला. अॅडलेड कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराट कोहली जानेवारीत बाबा होणार आहे. नव्या जबाबदारीची तयारी करण्यासाठी तसेच बाळाच्या स्वागतासाठी तो मायदेशी परतणार आहे. (Virat Kohli To Take Paternity Leave After First Test Against Australia Rohit Sharma Added To Squad Says Bcci)

रोहित शर्माच्या बाबतीत निवड समितीचा मोठा निर्णय

रोहित शर्माच्या पायाची नस दुखावली होती. मात्र मागील दोन आयपीएल मॅचमध्ये खेळून रोहितने दुखापतीतून बरा झाल्याचे दाखवून दिले. यानंतर त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार झाला. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीने निवड समितीने त्याला टी ट्वेंटी आणि वन डे साठी विश्रांती देऊन थेट टेस्ट दरम्यान खेळवण्याचा निर्णय घेतला.

संजू सॅमसनचा वन डे टीममध्ये समावेश

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी ट्वेंटीसाठी भारताचा विकेटकीपर म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनचा वन डे टीममध्येही समावेश झाला आहे. तो वन डे साठी अतिरिक्त विकेटकीपर म्हणून टीममध्ये असेल. संजूने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली. या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी ट्वेंटी, वन डे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारांसाठी भारताकडे दोन विकेटकीपर उपलब्ध असतील.

हॅमस्ट्रिंगमुळे वृद्धिमान साहा खेळणे कठीण

टेस्टसाठी विकेटकीपर म्हणून वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत या दोघांची निवड झाली आहे. यापैकी साहाला दुखापत झाली आहे. पायाची नस दुखावल्यामुळे (हॅमस्ट्रिंग इन्ज्युरी) तो खेळू शकत नाही. त्याच्या दुखापतीवर समितीचे लक्ष आहे. तो दुखापतीतून लवकर बरा झाला नाही तर काय करायचे याचा निर्णय पुढील काही दिवसांत होईल. 

दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीला वगळले, टी. नटराजनचा टी ट्वेंटीसाठी समावेश

वरुण चक्रवर्तीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी ट्वेंटीसाठी फिरकीपटू म्हणून समावेश झाला होता. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे टी. नटराजनचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी ट्वेंटी टीमध्ये समावेश झाला.

कमलेश नागरकोटीला दुखापतीमुळे वगळले

कमलेश नागरकोटी दुखापतीमुळे भारतासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. आधी कमलेश नागरकोटी, टी. नटराजन, कार्तिक त्यागी आणि इशान पोरेल या चौघांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अतिरिक्त गोलंदाज म्हणून निवड झाली होती.

ईशांत शर्माच्या फिटनेसवर निवड समितीचे लक्ष

भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दुखापतीतून सावरत असला तरी खेळण्यासाठी फिट झालेला नाही. निवड समिती त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. दुखापतीमुळे त्याची आयपीएल नंतर सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नाही.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

 वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

दोन अतिरिक्त गोलंदाज भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जातील - कार्तिक त्यागी, इशान पोरेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी