मुंबई इंडियन्सविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर सेहवागने दोन खेळाडूंवर केले सवाल उपस्थित

IPL 2021
Updated Apr 14, 2021 | 18:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2021: वीरेंद्र सेहवागने केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांच्या विचारावर सवाल उपस्थित केले आहेत जे मुंबई इंडियन्सविरुद्ध २८ चेंडूत ३१ धावा करू शकले नाहीत. 

virendra sehwag
मुंबईविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर सेहवागची केकेआरवर टीका 

थोडं पण कामाचं

  • मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला १० धावांनी मात दिली.
  • भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकच्या विचारांवर सवाल उपस्थित केले
  • केकेआरला २८ चेंडूत ३१ धावा करायच्या होत्या मात्र त्यांना ते जमले नाही

चेन्नई: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने(virendra sehwag) अनुभवी फिनिशर आंद्रे रसेल(andrew russel) आणि दिनेश कार्तिक(dinesh karthik) यांच्या फलंदाजीच्या विचारांवर सवाल उपस्थित केले आहेत. हे दोघेही फलंदाज कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्यांना मुंबईविरुद्ध विजयासाठी २८ चेंडूत ३१ धावांची गरज होती. हा सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. 

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सामन्याच्या सुरूवातीला मुंबईवर आपला ताबा ठेवून होता मात्र अखेरच्या क्षणी त्यांचा तोल गेला आणि त्यांनी १० धावांनी सामना गमावला. जेव्हा केकेआरने क्रीजवरीस नितीश राणा आणि शाकिब अल हसन या खेळाडूंना स्वस्तात गमावले तेव्हा त्यांच्या हातून सामना निसटला. त्यानंतर केकेआरचे विश्वासू फलंदाज रसेल आणि कार्तिक क्रीझवर होते. तसेच धावा आणि चेंडूही बरोबरीत होते. मात्र खराब फलंदाजीमुळे केकेआरला हे साधे आव्हान पार करता आले नाही. 

रसेलने १५ चेंडूत ९ धावा केल्या तर दिनेश कार्तिकला ११ चेंडूत ८ धावा करता आल्या. त्यांना एकही बाऊंड्री ठोकता आली नाही. सेहवाग म्हणाला,रसेल आणि कार्तिकला खेळपट्टीवर टिकून राहायचे होते मात्र सामना संपवायचा नव्हता. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, इयान मॉर्गनने पहिला सामना जिंकल्यानंतर म्हटले होते की ते याच सकारात्मकतेने क्रिकेट खेळतील. मात्र जेव्हा आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक खेळपट्टीवर आले तेव्हा असे अजिबात वाटले नाही. 

सेहवाग पुढे म्हणाला, रसेल आणि कार्तिक ज्या अंदाजात फलंदाजी करत होते त्यावरून वाटत होते की त्यांना सामना शेवटपर्यंत न्यायचा आहे मात्र जिंकायचा नाही आहे. शाकिब अल हसन, इयान मॉर्गन, शुभमन गिल आणि नितिश राणा यांनी सकारात्मकतेने फलंदाजी केली. 

केकेआरचा लाजिरवाणा पराभव - वीरेंद्र सेहवाग

सेहवाग पुढे म्हणाला, राणा अथवा गिल यापैकी कोणालातरी शेवटपर्यंत टिकून राहायला हवे होते. मुंबईची सुरूवात चांगली झाली होती. मात्र शेवटी त्यांच्या डावाची हालत झाली होती. १५३ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १५ ओव्हरमध्ये ४ बाद १२२ अशा सुस्थितीत होता. मात्र  त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी