IPL 2022:सेहवागने मुंबई इंडियन्सच्या जखमेवर चोळले मीठ, केले हे ट्वीट

IPL 2022
Updated Apr 07, 2022 | 21:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022: मुंबई इंडियन्सविरुद्ध धमाकेदार खेळी करत पॅट कमिन्सने केवळ १४ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 

pat cummins
IPL 2022:सेहवागने मुंबई इंडियन्सच्या जखमेवर चोळले मीठ 
थोडं पण कामाचं
  • पॅट कमिन्सने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले
  • कमिन्सच्या मुंबईच्या विजयाचा घास हिरावून घेतला
  • कमिन्सने १४ बॉलमध्ये ठोकले अर्धशतक

मुंबई: टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने बुधवारी मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. खरंतर, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा क्रिकेटर पॅट कमिन्सने १५ बॉलवर नाबाद ५६ धावांची तुफानी खेळी करत मुंबई इंडियन्सला एकट्यानेच चीतपट केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त खेळी करताना पॅट कमिन्सने केवळ १४ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले आणि आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पॅट कमिन्सने या बाबतीत लोकेश राहुलच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. virendra sehwag tweet about pat cummins game against mumbai indians

अधिक वाचा - बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, या राशींना होणार लाभ

सेहवागने मुंबईच्या जखमेवर चोळले मीठ

कोलकाता नाईट रायडर्स एका वेळेस पराभवाच्या उंबरठ्यावर होती. मात्र कमिन्सने पाहता पाहता सामन्याचे चित्रच बदलून टाकले. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या विजयाचा घास त्यांच्या तोंडातून हिरावून घेतला. टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे ट्वीट केले आहे. सेहवागने ट्विटरवर लिहिले, तोंडातून घास काढून घेतला. सॉरी वडापाव हिसकावून घेतला. पॅट कमिन्सने क्लीन हिटिंगचा जबरदस्त नमुना सादर केला. १५ बॉलमध्ये ५६धावा 

कमिन्सने विजयाचा घास हिरावला

कोलकाता नाईट रायडर्स एका वेळेस पराभवाच्या उंबरठ्यावर होता. त्यांचे १०१ धावांत पाच गडी गारद झाले होते. मात्र यानंतर पॅट कमिन्सने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. पॅट कमिन्सने काहीच चेंडूत सामन्याचे पारडे फिरवले. कमिन्सने येताच वादळास सुरूवात झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे काही चाललेच नाही. 

अधिक वाचा - लिंबू देता का हो कोणी लिंबू...400 रुपये प्रति किलो

रोहितने या खेळाडूंना ठरवले दोषी

रोहित शर्माने या सामन्यानंतर मोठे विधान केले. रोहितने सामन्यानंतर म्हटले, फलंदाजीत आम्ही चांगली सुरूवात केली नाही. अखेरच्या ४-५ ओव्हरमध्ये ७०पेक्षा अधिक धावा करण्यासाठी फलंदाजांकडून चांगले प्रयत्न करण्यात आले. आम्ही योजनेनुसार गोलंदाजी केली नाही. आम्ही योजनेनुसार गोलंदाजी केली नाही. आमच्याकडे काही ओव्हर्सचा खेळ होता. मात्र तेव्हा कमिन्स शानदार होता. रोहितच्या मते फलंदाजीत मुंबई संघाने चांगली कामगिरी केली नाही. अशातच मुंबईकडे वाचवण्यासाठी जास्त धावा नव्हत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी