IPL 2022: हैदराबादच्या संघाला मोठा झटका; त्रिपाठी नंतर हा खेळाडूही संघाबाहेर 

Sunrisers Hyderabad Players | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. दरम्यान हैदराबादच्या संघाने सलग दुसरा सामना जिंकून मजबूत पकड बनवली आहे. मात्र याचा आनंद विलियमसनचा संघ साजरा करत असतानाच संघाला लागोपाठ दोन झटके बसले आहेत.

Washington Sundar has been ruled out of the Hyderabad Team due to an injury
हैदराबादच्या संघाला मोठा झटका, त्रिपाठी नंतर हा खेळाडू बाहेर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ४ सामन्यात २ विजय मिळवले आहेत.
  • राहुल त्रिपाठीपाठोपाठ आता हैदराबादच्या संघाचा घातक गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर देखील बाहेर गेला आहे.

Sunrisers Hyderabad Players | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. दरम्यान हैदराबादच्या संघाने सलग दुसरा सामना जिंकून मजबूत पकड बनवली आहे. मात्र याचा आनंद विलियमसनचा संघ साजरा करत असतानाच संघाला लागोपाठ दोन झटके बसले आहेत. कर्णधार विलियमसनच्या संघाची गाडी रूळावर असतानाच संघाची डोकेदुखी वाढली आहे. कारण संघातील प्रमुख दोन खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. आगामी सामन्यात ते खेळण्याची शक्यता कमी आहे. (Washington Sundar has been ruled out of the Hyderabad Team due to an injury).

अधिक वाचा : दर्शन टोकनसाठी भाविकांची गर्दी, बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी

दरम्यान, राहुल त्रिपाठीपाठोपाठ आता हैदराबादच्या संघाचा घातक गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर देखील बाहेर गेला आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेले दोन प्रमुख खेळाडू बाहेर गेल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. वॉशिंग्टन सुंदरने मागील सामन्यात उल्लेखणीय कामगिरी केली होती. त्याने ३ षटकांत १४ धावा देऊन प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखूव ठेवला होता. 

दुखापतीचे कारण आले समोर 

वॉशिंग्टन सुंदर अंगठ्याच्या आणि बोटाच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला आराम करण्याचा सल्ला दिला जात आहे. दोन दिवसांच्या आरामानंतर तो मैदानात दिसेल असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्याला फिट होण्यासाठी साधारण एक आठवडाही लागू शकतो. 

शुक्रवारी आणि रविवारी हैदराबादचा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द आहे. या दोन्ही सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर टीममध्ये उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे विलियमसनच्या संघाला हा मोठा झटका असणार आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ४ सामन्यात २ विजय मिळवले आहेत. विलियमसनचा संघ गुणतालिकेत सध्या ४ गुणांसह आठव्या क्रमांकावर स्थित आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी