IPL 2022, GT vs RR:इंच टेप घेऊन मैदानात काय मोजत होता हार्दिक पांड्या?

IPL 2022
Updated Apr 15, 2022 | 14:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022: हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १०व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास आला आणि येतानाच एकदम कन्फ्युज दिसला. हार्दिक पांड्या आपल्या बॉलिंग मार्कबद्दल कन्फ्युज होता. 

hardik pandya
IPL 2022:इंच टेप घेऊन मैदानात काय मोजत होता हार्दिक पांड्या? 
थोडं पण कामाचं
  • गुरूवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान मजेशीर घटना पाहायला मिळाली. 
  • सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या मैदानात इंच टेप घेऊन घुसला.
  • सामन्यातच हार्दिक पांड्या टेप घेऊन काहीतरी मोजताना दिसला.

मुंबई: गुजरात टायटन्सने(gujrat titans) गुरूवारी खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सला(rajasthan royals) ३७ धावांनी मात देत सध्याच्या हंगामात आपला पहिला विजय मिळवला. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ टॉपवर आहे. गुरूवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान मजेशीर घटना पाहायला मिळाली. what is mesured by hardik pandya in ground during ipl match

अधिक वाचा - सोने आणि चांदीची झळाळी वाढली, सुरू झाली तेजी

इंच टेप घेऊन मैदानात काय करत होता हार्दिक पांड्या?

खरंतर, सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या मैदानात इंच टेप घेऊन घुसला. सामन्यातच हार्दिक पांड्या टेप घेऊन काहीतरी मोजताना दिसला. त्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबवण्यात आला. हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सच्या १०व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास आला. मात्र येताच तो कन्फ्युज दिसला. हार्दिक पांड्या आपल्या बॉलिंग मार्कवरून दुविधेत होता. त्याला कळत नव्हते की नॉर्मल रनअप मार्क कुठून आहे. 

व्हायरल होतोय हा व्हिडिओ

हार्दिक पांड्या अनेक निशान मार्क करून थकला होता आणि पुन्हा रनअप मोजण्यासाठी डगआऊटच्या दिशेने इशारा केला. यानंतर डगआऊटमधून मोजण्यासाठी इंच टेप आणण्यात आली. हार्दिक पांड्याने अनेकदा असे केले. या दरम्यान राजस्थान रॉयल्सचे फलंदाजही हे सर्व पाहत होते. यानंतर गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य इंचटेप घेऊन मैदानात आला त्याने हार्दिकला मोजण्यासाठी मदत केली. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा - ब्रेकिंग ! गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

सामन्यात हार्दिक पांड्याचा जलवा

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी