RCB vs MI Live Streaming, IPL 2020: केव्हा आणि कुठे पाहता येणार मुंबई-बंगळुरु सामन्याचं Live Streaming

IPL 2020
रोहित गोळे
Updated Sep 28, 2020 | 15:53 IST

Live Streaming, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians IPL 2020: आज आयपीएल 2020 चा 10 वा सामना बंगळुरू आणि मुंबई यांच्यात खेळला जाईल. जाणून घ्या आपण या सामन्याचे थेट प्रसारण कोठे पाहू शकता ते.

rcb_vs_mi
कुठे पाहता येणार मुंबई-बंगळुर सामन्याचं Live Streaming  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज रंगणार सामना 
  • सध्याच्या आयपीएलमध्ये आरसीबी आणि मुंबईने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे.
  • विराट आणि रोहित यांच्यात पाहायला मिळणार जोरदार टक्कर 

RCB vs MI IPL Live Streaming, 10th Match, Venue, India Time: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे.  बंगळुरू आणि मुंबईने आतापर्यंत दोन-दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आहे. मागील सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला किंग्ज इलेव्हन पंजाबने ९७ धावांनी पराभूत केले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने केकेआरचा पराभव केला होता.

चाहत्यांसाठी बंगळुरू-मुंबई हा सामना सुपर मंडेसारखा असणार आहे. कारण या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही संघांचे कर्णधार यांच्यात जोरदार झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शेवटच्या सामन्यात विराटला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता तो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पूर्ण उत्साहाने मैदानावर उतरणार आहे. त्याचवेळी रोहित शर्माने केकेआरविरुद्ध शानदार खेळी केली आणि तीच लय  राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

या सामन्यात काय पाहायला मिळणार, हा सामना कोठे खेळला जाईल, भारतीय वेळेनुसार सामना कोणत्या वेळी सुरू होईल आणि हे सामने कधी आणि कोठे पाहता येतील. या सर्वांची प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे सापडतील.

RCB vs MI Match: कधी खेळला जाईल? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2020 सामना ?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळविला जाणारा हा आयपीएल 2020 मधील १०वा सामना आहे. जो सोमवारी (28 सप्टेंबर) खेळला जाईल.

RCB vs MI Match Venue: बंगळुरू-मुंबई याच्यातील आयपीएल 2020 सामना कुठे खेळविण्यात येणार आहे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2020 चा 10 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. 

RCB vs MI Match Time in India: भारतात बंगळुरु आणि मुंबई यांच्यातील सामना किती वाजता पाहता येणार आहे? 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होईल. भारत आणि युएई दरम्यान अर्ध्या तासाचा फरक आहे. सामना यूएईच्या वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

RCB vs MI Match Live Streaming: कोणत्या चॅनल आणि ऑनलाइन पाहू शकता मुंबई-बंगलोर मॅचचं लाइव्ह प्रसारण?

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवर पाहता येईल. हा सामना आपण इंग्रजी आणि हिंदी भाषांसह पाहता येणार आहे. आयपीएल 2020 चे  ऑनलाईन अपडेट्स आणि सर्व बातम्यांसाठी आपण आमच्या आयपीएल-2020 पेजला भेट देऊ शकता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी