मुंबई: युवा खेळाडूंसाठी सगळ्यात मोठा क्रिकेटचा मंच म्हणजे आयपीएलची स्पर्धा. आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. यातच ताजे नाव मुंबई इंडियन्सकडून समोर आले आहे. गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्याआधी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. यातीलच एक खेळाडू म्हणजे रितिक शौकीन(Hrithik Shokeen) याच्याबाबत चाहत्यांना उत्सुकता आणि सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...
अधिक वाचा - या राशींचे शुभ दिवस सुरू होणार, होणार लक्ष्मीची कृपा
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या आयपीएलच्या हंगामातील सगळ्यात कमकुवत टीम्स म्हणून समोर आल्या आहेत. एकीकडे चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला तर मुंबई इंडियन्सला आतापर्यंतच्या ६ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. यासाठी जेव्हा दोन संघ गुरूवारी आमने-सामने आल्या तेव्हा दोन्ही संघाच्या प्रबंधकांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने रायली मेरेडिथ, डेनियल सॅम्स आणि रितिक शौकीन यांना संधी दिली आहे तर चेन्नईने मिचेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियस मैदानावर उतरला आहे.
मुंबई इंडियन्सने ज्या युवा खेळाडूला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. तो २१ वर्षीय रितिक शौकीन आहे. रितिकचा जन्म १४ ऑगस्ट २०००मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. तो उजव्या हाताचा ऑफ स्पिनर आहे. भारतासाठी अंडर १९ क्रिकेटमध्ये खेळताना आपली ओळख बनवणारा रितिक शौकीन आता आयपीएलच्या माध्यमातून जगावर आपली छाप सोडण्यास तयार आहे.
अधिक वाचा - भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
रितिकला नोव्हेंबर २०१९मध्ये एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये अंडर २३ भारतीय संघात स्थान दिले होते. त्या स्पर्धेत त्याने नेपाळविरुद्ध खेळताना आपल्या लिस्ट ए क्रिकेट करिअरची सुरूवात केली होती. त्यालाआयपीएल २०२२च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रूपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते.