कोण आहे जया भारद्वाज, जिला दीपक चहरने केले प्रपोझ

IPL 2021
रोहन जुवेकर
Updated Oct 08, 2021 | 01:20 IST

गुरुवारी आयपीएलची मॅच पंजाब किंग्सने तर प्रेक्षकांची मने चेन्नई सुपरकिंग्सचा २९ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याने जिंकली.

Who is Jaya Bhardwaj girlfriend of Deepak Chahar whom he proposed for marriage In Dubai cricket stadium
कोण आहे जया भारद्वाज, जिला दीपक चहरने केले प्रपोझ 

थोडं पण कामाचं

  • कोण आहे जया भारद्वाज, जिला दीपक चहरने केले प्रपोझ
  • चेन्नई सुपरकिंग्सचा २९ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर
  • दीपक चहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जया सोबतचे निवडक फोटो शेअर केले

दुबईः गुरुवारी आयपीएलची मॅच पंजाब किंग्सने तर प्रेक्षकांची मने चेन्नई सुपरकिंग्सचा २९ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याने जिंकली. मॅच नंतर दीपक चहरने स्टँडमध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला एक रिंग दाखवली. नंतर तो तिथेच पायरीवर एक पाय गुडघ्यात दुमडत अर्धवट उभा राहिला. दीपक चहरने या स्थितीत उभे राहून जयाला प्रपोझ केले. जयाने दीपकच्या प्रस्तावाचा स्वीकार केला. यानंतर दीपकने जयाच्या बोटात अंगठी घातली आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपक चहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जया सोबतचे निवडक फोटो शेअर केले आहेत. यात दीपक जयाला प्रपोझ करताना दिसत आहे. Who is Jaya Bhardwaj girlfriend of Deepak Chahar whom he proposed for marriage In Dubai cricket stadium

दीपकने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंना खास क्षण. फोटो सर्व काही सांगतात. आपले आशीर्वाद सदैव आमच्या सोबतीला असू द्या अशी कॅप्शन दिली. या फोटोंना अनेकांनी लाइक केले. 

कोण आहे जया भारद्वाज

हिंदी बिग बॉस स्पर्धेचा माजी स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाज याची बहीण आहे जया भारद्वाज. मागील अनेक दिवसांपासून जया दीपकला भेटण्याच्या निमित्ताने चेन्नईच्या मॅचवेळी स्टेडियममध्ये बसलेली दिसली. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जया आणि दीपक यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. पण दीपकने प्रपोझ करेपर्यंत दोघांनीही या मुद्यावर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळले होते. 

जया भारद्वाज मुंबई विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एका कॉर्पोरेट कंपनीत जबाबदारीचे पद सांभाळते. ती मूळची दिल्लीकर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच दीपकने जयाची ओळख टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्समधील सहकाऱ्यांशी करुन दिली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी