IPL 2022 Full Winners List: 'इमर्जिंग प्लेयर' ते 'सुपर स्ट्रायकर' पर्यंत कोणता अवॉर्ड कोणाला मिळाला? पाहा सर्व यादी 

IPL 2022
Updated May 30, 2022 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 Award Winners List । आपला पहिला आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने रविवारी रात्री झालेल्या फायनलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला चितपट करून आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

Who won the award from 'Emerging Player' to 'Super Striker', See all list 
उमरान मलिक नाही तर हा खेळाडू ठरला सर्वात वेगवान गोलंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आयपीएल २०२२ चा किताब गुजरात टायटन्सने जिंकला.
 • गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएलवर आपले नाव कोरले.
 • लॉकी फर्ग्युसन ठरला सर्वात वेगवान गोलंदाज.

IPL 2022 Award Winners List । अहमदाबाद : आपला पहिला आयपीएल हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने रविवारी रात्री झालेल्या फायनलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला चितपट करून आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गुजरातने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करून आपल्या पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावले आहे. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान गुजरातच्या गोलंदाजांनी विरोधी संघाच्या कर्णधाराचा निर्णय खोटा ठरवत राजस्थानला २० षटकांत ९ बाद केवळ १३० धावांवर रोखले. राजस्थानने दिलेल्या १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग हार्दिक सेनेने सहजरित्या केला आणि विजय मिळवला. (Who won the award from 'Emerging Player' to 'Super Striker', See all list). 

अधिक वाचा : सुकलेला आवळा तोंडाच्या दुर्गंधीला लावेल पळवून, वाचा सविस्तर

दरम्यान, फायनलचा थरार संपल्यानंतर पुरस्कार सोहळा आला, ज्यामध्ये या विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. यासोबतच यंदाच्या हंगामातील विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चला तर म जाणून घेऊया कोणता पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला. 

जोस बटलरच्या नावावर सर्वाधिक पुरस्कार 

 1. चॅम्पियन - गुजरात टायटन्स (२० कोटी)
 2. उपविजेता संघ - राजस्थान रॉयल्स (१२.५ कोटी)
 3. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर - जोस बटलर (१० लाख)
 4. ऑरेंज कॅप विजेता - जोस बटलर (१० लाख)
 5. पर्पल कॅप विजेता - युझवेंद्र चहल (१० लाख)
 6. कॅच ऑफ द सीझन - एविन लुईस (१० लाख)
 7. सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू - जोस बटलर (१० लाख)
 8. सर्वात वेगवान गोलंदाज - लॉकी फर्ग्युसन (१० लाख) 
 9. पॉवरप्लेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू - जोस बटलर (१० लाख)
 10. गेम चेंजर अवॉर्ड - जोस बटलर (१० लाख)
 11. सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन - दिनेश कार्तिक (टाटा पंच)
 12. सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू - जोस बटलर (१० लाख)
 13. इमर्जिंग प्लेयर - उमरान मलिक (१० लाख) 

बटलरने या हंगामात केल्या ८६३ धावा

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने या हंगामात सर्वाधिक ८६३ धावा केल्या. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचे दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. याआधी राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. तेव्हा या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी