IPL 2022, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore: राजस्थान रॉयल्स(rajasthan royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore) यांच्यात हंगामातील १३ वा सामना मुंबईत(mumbai खेळवण्यात आला. यात आरसीबीने ४ विकेटनी विजय मिळवला. बंगळुरूच्या विजयात विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकचे(Dinesh Karthik) महत्त्वाचे योगदान होते. त्याने २३ बॉलमध्ये चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. या शानदार कामगिरीमुळे कार्तिकला ्प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले.
अधिक वाचा - लखनौवर दबाव असताना का झाला दिल्लीचा पराभव
वानखेडे स्टेडियममध्ये दिनेश कार्तिकच्या या खेळीने निदहास ट्रॉफीच्या आठवणी ताज्या केल्या. येथेही कार्तिकने भारताला विजयी केले होते. २०१८मधील शेवटच्या बॉलवर दिनेश कार्तिकने मारलेला षटकार फार कमी लोक विसरले असतील. दोन्ही डावात दिनेश कार्तिकच्या जबरदस्त खेळीचा आविष्कार पाहायला मिळाला होता.
जर तुम्ही दिनेश कार्तिकचे हेल्मेट पाहिले तर ते बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळे आहे. बेसबॉल टाईप प्रोटेक्टरसह त्याचे हे हेल्मेट साऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
खुद्द दिनेश कार्तिकने हे हेल्मेट घालण्याबाबतचे कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र हे हेल्मेट वजनाने हलके असतात. हे एक तांत्रिक कारण असू शकते. असे नाही की कार्तिकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्यांदा हे हेल्मेट घातले आहे. याआधीही अनेकदा तो या हेल्मेटसह मैदानात उतरला आहे.
अधिक वाचा - सुप्रिया सुळे यांच्यासोबत अशा अंदाजात बोलताना दिसले शशी थरूर
दिनेश कार्तिकशिवाय राहुल त्रिपाठीही या पद्धतीनेच्या हेल्मेटसह दिसला आहे. तर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara), जेम्स टेलर (James Taylor)यासारखे दिग्गजही अशा प्रकारचे हेल्मेट घालत.