'माझ्या काकांची हत्या करण्यात आली', अखेर सुरेश रैनाने सोडलं मौन

IPL 2020
Updated Sep 01, 2020 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suresh Raina: सुरेश रैनाने गंभीर अपराधाचा खुलासा केला आहे. यात त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या मृ्त्यूचे कारण सांगितले आहे.

suresh raina
आयपीएल सोडून सुरेश रैना भारतात का परतला, जाणून घ्या कारण 

थोडं पण कामाचं

  • सुरेश रैनाने ट्विटरच्या माध्यमातून यूएईवरून भारतात परतण्याचे कारण सांगितले
  • रैनाने सांगितले की पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयानक होते
  • सुरेश रैनाने सांगितले त्याच्या आत्याच्या मुलाचेही निधन झाले आहे

मुंबई: चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने(Suresh Raina) यूएईवरून(UAE) अचानक भारतात परतण्याचे कारण अखेर सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रैना अचानक भारतात(Return in india) का परतला यावर तर्क वितर्क सुरू होते, अखेर रैनाने यावरील मौन सोडले आहे. या वर्षी आयपीएलची स्पर्धा(IPL 2020) यूएईमध्ये खेळवली जात आहे. सुरेश रैना म्हणाला, माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयानक होते. रैनाने आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून याबाबतचा खुलासा केला आहे. यात त्याने सांगितले की त्याच्या आत्याच्या मुलाचे निधन झाले. त्याची आत्या व्हेंटिलेटरवर आहे. 

सुरेश रैनाने ट्वीट केले की, पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयानक होते. माझ्या काकांची हत्या करण्यात आली. माझा भाऊ आणि आत्याला दुखापत झाली. भयानक म्हणजे अनेक दिवस संघर्षानंतर माझ्या चुलतभावाचे निधन झाले. माझ्या आत्याची तब्येत नाजूक आहे आणि ती व्हेंटिलेटरवर आहे. 

रैनाने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, आतापर्यंत आम्हाला समजले नाही की अखेर त्या रात्री काय घडले आणि कोणी केले. मी पंजाब पोलिसांना याबाबत अधिक तपासाचा आग्रह केला आहे. आम्हाला कमीत कमी समजले तरी पाहिजे की हा अपराध कोणी केला. या अपराधींना अधिकाधिक शिक्षा मिळाली पाहिजे. 

सीएसकेकडून समर्थन

भारताच्या माजी क्रिकेटर अचानक भारत परतण्यावरून अखेर खुलासा झाला आहे. सीएसकेचे बॉस एन श्रीनिवाससने सोमवारी सांगितले होते की फ्रेंचायजीकडून त्यांना पूर्ण समर्थन मिळणार आहे. रैना पुढील वर्षी सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसणार का हे विचारले असता श्रीनिवाससने म्हणाले, पुढील वर्ष यायचे आहे. रैना शानदार क्रिकेटर आहे. तो सीएसकेसाठी महत्त्वाचा क्रिकेटर आहे आणि चेन्नईचा संघ त्याच्या पाठिशी आहे. 

कोरोना व्हायरस महामारीमुळे या वर्षी आयपीएल यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळवली जात आहे. आयपीएल २०२०चे सामने तीन ठिकाणे दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवली जाणार आहे. 

दरम्यान, सुरेश रैनाने अचानक आयपीएल का सोडली याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. काहींनी म्हटले होते की कोरोनामुळे रैना आयपीएल सोडून आला. तर काहींनी राहण्याच्या जागेवरून वाद झाल्याने रैनाने आयपीएल सोडली असे म्हटटले जात होते. तर काहींनी रैनाचा धोनीसोबत वाद झाल्याचेही सांगितले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी