मुंबईतील आयपीएलचे सामने रद्द? राज्यात लॉकडाऊनचा किती होणार परिणाम

IPL 2021
Updated Apr 14, 2021 | 14:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्यात आजपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आयपीएलच्या सामन्यावर याचा काय परिणाम होईल हे लवकरच समजेल.

ipl
मुंबईतील आयपीएलचे सामने रद्द? राज्यात लॉकडाऊनचा किती परिणाम 

थोडं पण कामाचं

  • कोरोनादर्यान आयपीएलच्या १४व्या हंगामातील सामने ६ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत दोन सामने झाले आहेत
  • आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू कोरोनाबाधित झाले होते.

Maharashtra Lockdown, IPL 2021: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती भयंकर आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. आज बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू होत आहे.

या लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. ब्रेक दि चेन हे अभियान राबवले जाणार आहे. या दरम्यान राज्यात क१४४ कलम लागू करण्यात आले आहे. अशातच असा सवाल उठत आहे की मुंबईत खेळवले जाणारे आयपीएलचे सामने होणार का? यावर किती परिणाम होणार. कोरोनादर्यान आयपीएलच्या १४व्या हंगामातील सामने ६ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. अनेक सामने या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, आता सवाल असा उरतोय की राज्यात लावण्यात आलेली बंदी आयपीएलवरही लागू असेल का? काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने म्हटले होते की नाईट कर्फ्यू असताना संघाला सूट देण्यात आली आहे. त्यात रात्रीच्या वेळेस ट्रेनिंग करू शकतात. 

आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू कोरोनाबाधित झाले होते. आरसीबीची देवदत्त पड्डीकल, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा स्पर्धा सुरू होण्याआधी कोरोनाबाधित झाले होते. दरम्यान, नितीशराणा आणि देवदत्त कोरोनामधून बरे झाले आहेत.

वानखेडे स्टेडियमचा कर्मचारी वर्ग आणि सीएसकेचा कंटेंट टीमचा सदस्यही कोरोनाबाधित झाले होते. जे कोरोना बाधित झाले होते त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते. यामुळे संघात येण्यासाठी त्यांना निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत नियमाप्रमाणे विलगीकरणात राहावे लागले होते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकता, बंगळुरू, आणि चेन्नईमध्ये ही स्पर्धा होणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी