विराट कोहली सोडणार आरसीबीची साथ? संघाने ट्वीट करत दिली माहिती

IPL 2021
Updated Apr 07, 2021 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व फ्रेंचायझी टीममध्ये एक टीम अशी आहे जिच्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत ती म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. आतापर्यंत या संघाने आयपीएलचा खिताब जिंकलेला ना

virat kohli
विराट कोहली सोडणार आरसीबीची साथ? संघाने ट्वीट करत दिली माहित 

थोडं पण कामाचं

  • आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरूवात दोन धुरंधर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघादरम्यानच्या सामन्याने होणार आहे
  • आरसीबीने बुधवारी या दिग्गज खेळाडूचा फोटो शेअर करत एक विचार पोस्ट केला
  • यानंतर संघात सामीलकेलेल्या रजत पाटीदार या युवा खेळाडूचेही नाव आहे.

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीग(indian premier league) २०२१च्या नव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत खेळवणाऱ्या सर्व फ्रेंचायजी टीममधील एक टीम अशी आहे जिच्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. हा संघ म्हणजे विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखाली खेळणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore). आतापर्यंत या संघाने एकदाही आयपीएलचा खिताब जिंकलेला नाही. यावेळी आरसीबीचा संघ विजयासाठी दावेदार मानला जात आहे. 

आयपीएलच्या नव्या हंगामाची सुरूवात दोन धुरंधर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघादरम्यानच्या सामन्याने होणार आहे. ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होत आहे. विराटचा संघ या सामन्यात विजय मिळवत विजयी सुरूवात करू पाहणार आहे तर गतविजेता चॅम्पियन असलेल्या मुंबईलाही विजयाची आस आहे. 

आरसीबीने बुधवारी या दिग्गज खेळाडूचा फोटो शेअर करत एक विचार पोस्ट केला. यात कर्णधार विराट कोहलीच्या फोटोसह लिहिले आहे की तो टीम सोडण्याबाबत विचार करू शकत अथवा दुसऱ्या कोणत्याही टीमचा भाग होण्याचा विचार त्याच्या मनात येईल.

यात मिस्टर ३६० डिग्री नावाने प्रसिद्ध दिग्गज क्रिकेटर एबी डे विलियर्सच्या नावाचाही समावेश आहे. 

यानंतर संघात सामीलकेलेल्या रजत पाटीदार या युवा खेळाडूचेही नाव आहे. या खेळाडूसोबत लिहिले की मिळणाऱ्या संधीला दोन्ही हातांनी मिळवण्यासाठी तयार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी