Worldcup 2019: या खेळाडूनं स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड, वर्ल्डकपमधून पत्ता कट

IPL 2019
Updated Apr 15, 2019 | 20:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Worldcup 2019: दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात चौथ्या नंबरवर बॅटिंग करणाऱ्याला क्रिकेटपटूला वर्ल्डकपच्या टीममध्ये सहभागी करण्यात आलं नाही. या खेळाडूनं स्वत: आपल्या हातातील सुवर्ण संधी गमावली.

Amabti Raydu Virat kholi
विराट कोहलीसोबत अंबाती रायुडू  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: इंग्लंडमध्ये ३० मे रोजीपासून खेळल्या जाणाऱ्या १२व्या वनडे वर्ल्डकप क्रिकेटसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबईत बीसीसीआयनं केलीय. टीमनं वर्ल्डकपसाठी त्याच खेळाडूंना संधी दिलीय जे गेल्या दोन वर्षांपासून टीमसाठी खेळत आहेत. वर्ल्डकप टीमच्या संभाव्य यादीत टीममध्ये नंबर ४ वर खेळणाऱ्या अंबाती रायुडूचं नाव जवळपास ठरलं होतं. मात्र अखेर त्यानं आपली संधी गमावली. आयपीएलच्या १२ व्या सिझनच्या सुरूवातीपासूनच चेन्नई टीममधून खेळणाऱ्या रायुडूची वर्ल्डकप टीममध्ये वर्णी लागणार असल्याचं मानलं जात होतं. पण आयपीएलच्या सिझनमध्ये अंबाती रायुडूच्या खराब प्रदर्शनामुळे त्यानं वर्ल्डकपची आपली संधी गमावल्याचं सांगण्यात येतंय. खराब प्रदर्शन करत रायुडूनं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचं दिसतंय.

आयपीएलच्या सध्याच्या सिझनमध्ये रायुडू ८ पैकी सात मॅचमध्ये केवळ एकच वेळा नॉटआऊट राहून १९.७१ सरासरी आणि ८६.२५ स्ट्राईक रेटनं केवळ १३८ रन्स बनवले. त्यानं पूर्ण ८ मॅचमध्ये फक्त एकदाच हाफसेंच्युरी केली. मागील सात मॅचमध्ये रायुडूनं २८,५,१,०,२१,५७ आणि ५ रन्स केले. अशात ऐनवेळी फॉर्म गमावल्यामुळे त्याची संधी गेली.

अंबाती रायुडूनं आपल्या वनडे करिअरमध्ये ५५ मॅच खेळल्या आहेत. त्यातील ५० मॅचमध्ये त्यानं ४७.०५च्या सरासरीनं ७९.०४च्या स्ट्राईक रेटनुसार १६९४ रन्स बनवले. या दरम्यान, रायुडूनं ३ सेंच्युरी आणि १० हाफसेंच्युरी केल्या. त्याचं गेल्या चार वर्षातील करिअरमध्ये खूप चढ-उतार पाहायला मिळाले.

२०१८मध्ये नंबर ४च्या पोझिशनसाठी टीम इंडिया खेळाडूच्या शोधातच होती. तेव्हा सर्वाधिक संधी मिळूनही रायुडूनं विशेष प्रदर्शन केलं नाही. २०१८मध्ये त्यानं ११ मॅच खेळल्या त्यातील १० मॅचमध्ये ५६ च्या सरासरीनं आणि ९०.७४च्या स्ट्राईक रेटनुसार ३९२ रन्स बनवले. ज्यात एक सेंच्युरी आणि तीन हाफसेंच्युरी होत्या. तर २०१९ साली आतापर्यंत रायुडूनं १० मॅच खेळल्या. त्यात ३०.८७ च्या सरासरीनं ७५.३० च्या स्ट्राईक रेटनं २४७ रन्स बनवले. त्यात एका हाफसेंच्युरीचा समावेश आहे.

गेल्या वर्षी वेस्टइंडिज विरुद्ध घरगुती वनडे सीरिजमध्ये रायुडूनं पाच मॅचच्या सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. तेव्हा वाटलं होतं की, टीमची नंबर ४ ची समस्या संपली असती. मात्र यानंतर रायुडू ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड दौऱ्यामध्ये अयशस्वी ठरला. यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाच मॅचच्या वनडे सीरिजमध्येही रायुडूनं चांगली बॅटिंग केली नाही. आयपीएलमध्ये पण तो अयशस्वी ठरला आणि स्वत:ची सुवर्णसंधी गमावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Worldcup 2019: या खेळाडूनं स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड, वर्ल्डकपमधून पत्ता कट Description: Worldcup 2019: दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात चौथ्या नंबरवर बॅटिंग करणाऱ्याला क्रिकेटपटूला वर्ल्डकपच्या टीममध्ये सहभागी करण्यात आलं नाही. या खेळाडूनं स्वत: आपल्या हातातील सुवर्ण संधी गमावली.
Loading...
Loading...
Loading...