कॅप्टन कोहलीनं केलं धोनीचं कौतुक, माहीच्या टीकाकारांनाही सुनावलं

IPL 2019
Updated Apr 19, 2019 | 12:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विरोट कोहलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. तसंच माहीवर टीका करणाऱ्यांना कोहलीनं सुनावलं.

Dhoni and Kohli
विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी  |  फोटो सौजन्य: AP, File Image

नवी दिल्ली: टीम इंडियाला २ वेळा वर्ल्डकप चॅम्पियन बनवणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या करिअरचा शेवटचा वर्ल्डकप खेळायला इंग्लंडला जात आहे. सध्या धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल १२ मध्ये कॅप्टन्सी सांभाळतोय. मात्र आयपीएल पेक्षाही यावेळी धोनीसाठी वर्ल्डकप महत्त्वाचा आहे. माहीचं विकेटच्या मागे राहून मॅच दरम्यान कोहलीला सल्ला देणं, हे भारतीय टीमच्या यशाचं एक गुपित मानलं जात आहे. स्वत: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं हे कबूल केलंय. कोहलीनं नुकतंच इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत माहीवर कौतुकाचा वर्षाव केला. तसंच धोनीवर टीका करणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलं.

विराट कोहलीनं आपल्या मुलाखतीत सांगितलं, ‘धोनी वर्ल्डकपमध्ये फक्त एक विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून नाही तर टीमची कॅप्टन्सी सांभाळतांनाही दिसू शकतो. धोनीला कर्णधारपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तो बॉलर्स आणि फिल्डिंगमध्ये बदल करताना महत्त्वाचा सल्ला पण देतो, जे की टीमसाठी अतिशय उपयुक्त ठरतं. मी बाऊंड्रीवर फिल्डिंग करत असतांना धोनी स्वत: विकेटच्या मागे राहून सर्व सांभाळतो. त्यामुळं माझं काम हलकं होतं.’

कर्णधार कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यामधील मैत्री, प्रेम हे कोणत्याही क्रिकेट चाहत्यापासून लपलेलं नाही. दोन्ही खेळाडू मैदानात एकमेकांचा सन्मान करतातच, पण मात्र मैदानाबाहेर यांची मैत्रीही बघायला मिळते.

कोहलीनं सांगितलं, ‘मला आजही ते आठवतं, जेव्हा एक कर्णधार म्हणून धोनीनं माझं समर्थन केलं होतं. माझ्यासाठी धोनीवर जे लोक टीका करतात ते सहन करणं खूप दुर्दैवी आहे. जेव्हा मी टीममध्ये आलो होतो तेव्हा धोनीजवळ काही मॅचनंतर दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय होता. मला त्यांनी ज्या संधी दिल्या त्याचं मी सोनं केलं. मात्र यासाठी कर्णधार म्हणून मला त्याची साथ खूप आवश्यक होती. त्यांनी मला तिसऱ्या नंबरवर खेळण्याची संधी दिली, कारण की बऱ्याच तरुण खेळाडूंना तिसऱ्या नंबरवर खेळण्याची संधी मिळत नाही.’

कोहलीनं धोनीचं कौतुक करतांना म्हटलं की, ‘मॅचची परिस्थिती धोनी शिवाय दुसरं कुणीही चांगल्याप्रकारे ओळखू शकत नाही. तो असा खेळाडू आहे की त्याला क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे समजतं. पहिल्या बॉलपासून तर अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मैदानावर धोनीचं लक्ष असतं. मी असं नाही म्हणत की त्यांचं मैदानावर असणं माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण मी नशीबवान आहे की त्याच्यासारखा खेळाडू विकेटच्या मागे उभा राहतो. मी मॅचच्या डावपेचांबाबत धोनी आणि रोहित शर्मा सोबत चर्चा करतो. डेथ ओव्हर्समध्ये मला सीमारेषेवर उभं रहावं लागतं. ३०-३५ ओव्हरनंतर धोनीला माहिती असतं की मी सीमारेषेवर फिल्डिंगला जाईल, तेव्हा तो स्वत: संघाचं कर्णधारपद सांभाळतो.'

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कॅप्टन कोहलीनं केलं धोनीचं कौतुक, माहीच्या टीकाकारांनाही सुनावलं Description: भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विरोट कोहलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. तसंच माहीवर टीका करणाऱ्यांना कोहलीनं सुनावलं.
Loading...
Loading...
Loading...