Yashasvi Jaiswal: जैसवालच्या मॉन्स्टर सिक्सने हरवला बॉल, नंतर अंपायरला करावे लागले हे काम

IPL 2022
Updated May 16, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jaiswal six in ipl: लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैसवालने १०३ मीटर लांबीचा सिक्स ठोकला. 

yashasvi jaiwal
जैसवालच्या मॉन्स्टर सिक्सने हरवला बॉल, अंपायरने केले हे काम 
थोडं पण कामाचं
  • राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात युवा फलंदाज यशस्वी जैसवालने एक गगनचुंबी सिक्स ठोकला
  • राजस्थानच्या डावाच्या सहाव्या ओव्हरध्ये दुशमंता चमिरा गोलंदाजी करत होता.
  • जैसवालने या ओव्हरमध्ये आपल्या बॅटने बॉल स्टेडियममबाहेर मारला

मुंबई: आयपीएल २०२२च्या(ipl 2022) हंगामात क्रिकेटर चाहत्यांना मोठमोठे सिक्स पाहायला मिळत आहेत. आयपीएलचा १५वा हंगामाच या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सिक्स(largest six) असलेला हंगाम बनला आहे. या हंगामाच्या आधी एका स्पर्धेत सर्वाधिक ८७२ सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड लागला होता. मात्र यावेळेस हा आकडा पार झाला आहे आणि आता आणखीही सामने बाकी आहेत. रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा(rajasthan royals)फलंदाज यशस्वी जैसवालच्या(yshasvi jaiswal) एका सिक्सची चांगलीच चर्चा होत आहे. yashasvi jaiswal hit six with 103 meter long, ball lost 

अधिक वाचा - आसाममधील पुरामुळे 7 जिल्ह्यांतील सुमारे 57,000 लोक प्रभावित

जैसवालच्या लांब सिक्सने हरवला बॉल

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात युवा फलंदाज यशस्वी जैसवालने एक गगनचुंबी सिक्स ठोकला मात्र बॉल परत मैदानावर आलाच नाही. राजस्थानच्या डावाच्या सहाव्या ओव्हरध्ये दुशमंता चमिरा गोलंदाजी करत होता. जैसवालने या ओव्हरमध्ये आपल्या बॅटने बॉल स्टेडियममबाहेर मारला. जैसवालने टायमिंगसह १०३ मीटर लांब सिक्स ठोकला. बॉल स्टेडियमबाहेर गेल्यानंतर अंपायरला दुसरा बॉल मागवावा लागला. त्यानंतर खेळ पुढे सुरू झाला. 

येथे पाहा मॉन्स्टर सिक्सचा व्हिडिओ

IPL 2022 चा सगळ्यात लांब सिक्स

आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक लांब सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड पंजाब किंग्सचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनच्या नावावर आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या बॉलवर आयपीएल २०२२मधील सर्वात लांब सिक्स ठोकला होता. लियाम लिव्हिंगस्टोनने गुजरात टायटन्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ११७ मीटर लांब सिक्स ठोकला होता. मुंबईच्या डेवाल्ड ब्रेविसने या हंगामात ११२ मीटरचा सिक्स ठोकला होता. 

अधिक वाचा - CRPF पथकावर दहशतवाद्यांचा Attack

हंगामात जैसवालची कामगिरी

यशस्वी जैसवालने या सामन्यात २९ बॉलवर ४१ धावांची खेळी केली. या डावात त्याच्या बॅटमधून ६ फोर आणि १ सिक्स निघाला होता. यशस्वी जैसवालने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंतच्या ६ सामन्यांमध्ये २५.५०च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. यशस्वी जैसवालला पहिल्यांदा २०२०मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी