Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलने IPL मध्ये रचला इतिहास; असा करणारा ठरला पहिला भारतीय स्पिनर 

IPL 2022
Updated May 21, 2022 | 14:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuzvendra Chahal IPL 2022 । आयपीएल २०२२ मध्ये युझवेंद्र चहल आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या हंगामात चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला आहे.

 Yuzvendra Chahal made history in IPL
युझवेंद्र चहलने IPL मध्ये रचला इतिहास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे.
  • आयपीएल २०२२ मध्ये युझवेंद्र चहल आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
  • चहलच्या नावावर आता आयपीएल २०२२ मध्ये २६ बळी आहेत.

Yuzvendra Chahal IPL 2022 । मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये युझवेंद्र चहल आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या हंगामात चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात चहलची पुन्हा एकदा शानदार फिरकी पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. (Yuzvendra Chahal became the first Indian spinner to take 26 wickets in a single IPL season). 

अधिक वाचा : कधी आणि कसा सुरू झाला दहशतवाद विरोधी दिवस?, वाचा सविस्तर

चहलने IPL मध्ये रचला इतिहास

राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ २६ धावा देत २ बळी घेतले. चहलच्या नावावर आता आयपीएल २०२२ मध्ये २६ बळी आहेत. यासह युझवेंद्र चहल आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे.

हरभजन सिंगच्या नावावर २४ बळी 

हरभजन सिंग आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना एका हंगामात २४ बळी पटकावले होते. हरभजन सिंगचा हा विक्रम मोडायला तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चहलने आतापर्यंत २६ बळी घेतले आहेत, त्याच्याकडे आणखीही बळी पटकावण्याची संधी आहे. कारण त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे त्याचा बळी घेण्याचा करिश्मा चालू राहण्याची शक्यता आहे. 

इम्रान ताहिरच्या विक्रमाची केली बरोबरी

या सामन्यात युझवेंद्र चहलने आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. आयपीएलच्या एका हंगामात फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम इम्रान ताहिरच्या नावावर आहे. इम्रान ताहिरने २०१९ मध्ये २६ बळी घेत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. या हंगामात चहलने २६ बळी घेत या विक्रमाची बरोबरी केली आहे. आणखी एक नवीन विक्रम आपल्या नावावर करण्यापासून चहल फक्त १ बळी घेण्यापासून दूर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी