IPL 2022: पर्पल कॅपच्या शर्यतीत नवीन ट्विस्ट, फायनलच्या सामन्यात बळी पटकावून चहल मारणार बाजी? 

IPL 2022
Updated May 28, 2022 | 13:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 Purple Cap | आयपीएल २०२२ मध्ये पर्पल कॅपची शर्यत खूपच रंगली आहे. ही शर्यत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगा यांच्यामध्ये आहे.

Yuzvendra Chahal has a chance to win the Purple Cap by taking 1 wicket in the final match
फायनलमध्ये १ बळी पटकावून पर्पल कॅप जिंकण्याची चहलला संधी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएल २०२२ मध्ये पर्पल कॅपची शर्यत खूपच रंगली आहे.
  • फायनलमध्ये १ बळी पटकावून पर्पल कॅप जिंकण्याची युझवेंद्र चहलला संधी आहे.
  • जोस बटलरकडे असणार ऑरेंज कॅप.

IPL 2022 Orange and Purple Cap | मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये पर्पल कॅपची शर्यत खूपच रंगली आहे. ही शर्यत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांच्यामध्ये आहे. दोन्ही फिरकीपटूंनी यंदाच्या हंगामात २६-२६ बळी पटकावले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आरसीबीचा आयपीएलमधील प्रवाल संपला आहे. अशा स्थितीत चहलकडे अंतिम सामन्यात १ बळी घेऊन पर्पल कॅप जिंकण्याची संधी आहे. फायनलच्या सामन्यात तो बळी घेऊ शकला नाही तर उत्तम गोलंदाजीच्या सरासरीच्या जोरावर वानिंदू हसरंगाच्या डोक्यावर पर्पल कॅप विराजमान होईल. (Yuzvendra Chahal has a chance to win the Purple Cap by taking 1 wicket in the final match).  

अधिक वाचा : गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

या हंगामात सर्वाधिक बळी घेणारे टॉप-५ गोलंदाज

क्रमांक गोलंदाज सामने   बळी सरासरी
 वानिंदू हसरंगा १६ २६ ७.५४
युझवेंद्र चहल १६ २६ ७.९२ 
कगिसो रबाडा १३ २३ ८.४५ 
उमरान मलिक १४ २२ ९.०३
कुलदीप यादव १४ २१ ८.४३


जोस बटलर ऑरेंज कॅपचा दावेदार 

बटलरने या हंगामात आतापर्यंत १६ सामन्यांमध्ये १५१.४७ च्या स्ट्राइक रेटने ८२४ धावा केल्या आहेत. धावा करण्याच्या बाबतीत तो इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. बटलर पाठोपाठ लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल राहुल आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. पण लखनऊ आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे हे दोन्ही फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेले आहेत. त्यामुळे साहजिकच जोस बटलरच ऑरेंज कॅपचा दावेदार असेल. 

क्रमांक  फलंदाज सामने धावा स्टाइक रेट
जोस बटलर १६ ८२४ १५१.४७
के. एल राहुल १५ ६१६ १३५.३८
क्विंटन डिकॉक १५ ५०८  १४८.९७
फाफ डु प्लेसिस १६ ४६८ १२७.५२
शिखर धवन   १४ ४६० १२२.६६

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी