IPL 2022: चहलची हॅट्रिक अय्यरवर पडली भारी; पण सामन्याचा खरा हिरो ठरला हा खेळाडू 

IPL 2022
Updated Apr 19, 2022 | 14:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuzvendra chahal IPL | सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. क्रीडाविश्वात असे म्हणतात की जो शेवटच्या क्षणापर्यंत दबावाला बळी पडत नाही, त्याच्या झोळीत विजय असतो. असेच काहीसे सोमवारी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या सामन्याने ते पुन्हा एकदा सिद्ध केले.

Yuzvendra Chahal took a hat trick in the match against Kolkata Knight Riders
चहलची हॅट्रिक अय्यरवर पडली भारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे.
  • केकेआर विरूद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने एका षटकात ४ बळी घेतले.
  • जोस बटलरने आक्रमक शतक झळकावून राजस्थान रॉयल्सची धावसंख्या पाच बळींच्या जोरावर २१७ धावांपर्यंत नेली.

Yuzvendra chahal IPL | मुंबई : सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. क्रीडाविश्वात असे म्हणतात की जो शेवटच्या क्षणापर्यंत दबावाला बळी पडत नाही, त्याच्या झोळीत विजय असतो. असेच काहीसे सोमवारी झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या सामन्याने ते पुन्हा एकदा सिद्ध केले. दोन्ही संघामध्ये चांगलीच टक्कर झाली होती आणि सामन्याच्या शेवटच्या षटकांपूर्वी कोण जिंकेल हे सांगणे देखील कठीण होते. केकेआरला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत ११ धावांची आवश्यकता होती. (Yuzvendra Chahal took a hat trick in the match against Kolkata Knight Riders). 

अधिक वाचा : कर्मचारी देत होते राजीनामा...कंपनीने केले फक्त 4 दिवस काम

उमेश यादवने तीन षटकांत ३८ धावा करत दोन षटकार आणि एक चौकाराच्या जोरावर सामन्याचा थरार कायम ठेवल्याने हे आव्हान अवघड वाटले नाही. उमेश यादवच्या आक्रमक खेळीने केकेआरची विजयाकडे वाटचाल चालली होती. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडे चारही प्रमुख गोलंदाजांचा कोटा संपत चालला होता. ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकीपटूंनी प्रत्येकी चार षटके पूर्ण केली. 

कर्णधार संजू सॅमसनकडे त्याचा पाचवा गोलंदाज ओबेद मॅकॉयशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मॅकॉयने तीन षटकांत ३८ धावा दिल्या. आयपीएलमध्ये पदार्पणाचा खेळत असताना मॅकॉय हे आव्हान पेलेल की नाही याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम होता. पण पदार्पणाचा सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी मॅकॉयने दबावाच्या क्षणांमध्ये कोणतीही चूक केली नाही. त्याने पहिल्या चेंडूवर फक्त दोन धावा दिल्या. तर दुसऱ्या चेंडूवर शेल्डन जॅक्सनला शॉर्ट फाईन लेगवर झेलबाद केले.

अधिक वाचा : तर दिल्ली पोलिसांविरोधात युद्ध पुकारु, विहिंपची दर्पोक्ती

चहलची हॅट्रिक 

युझवेंद्र चहल सामन्याचे १७ वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा कोलकाताला चार षटकांत ४० धावा करायच्या होत्या आणि कोलकाताचे सहा बळी शिल्लक होते. चहलने पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरला बाद केले आणि षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद केले. हॅट्ट्रिकसह चहलने या षटकात एकूण चार बळी पटकावले. अखेर चहलच्या हॅट्रिकच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने केकेआरवर विजय मिळवला. 

बटलरचे जोरदार शतक 

यापूर्वी पहिल्या डावात इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलरने आक्रमक शतक झळकावून राजस्थान रॉयल्सची धावसंख्या पाच बळींच्या जोरावर २१७ धावांपर्यंत नेली. बटलरने ६१ चेंडूत १०३ धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत नऊ चौकारांसह पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला या हंगामातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. बटलरने त्याच्या पहिल्या नऊ चेंडूत फक्त तीन धावा करू शकला मात्र तो जसजसा सेट होत गेला तशी त्याची खेळी आक्रमक होत गेली. लक्षणीय बाब म्हणजे त्याने स्वत:वरही नियंत्रण ठेवले आणि कोलकाताकडून १५० वा सामना खेळणाऱ्या सुनील नरेनच्या गोलंदाजीवर कोणतीही जोखीम पत्करली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी