मनीषनं लग्नात शेरवानी घातलेली आहे. तर अश्रितानं सिल्कची साडी नेसलीय. या फोटोमध्ये मनीष-अश्रिताच्या गळ्यात हार घालतांना दिसत आहे.
मनीषनं लग्नात शेरवानी घातलेली आहे. तर अश्रितानं सिल्कची साडी नेसलीय. या फोटोमध्ये मनीष-अश्रिताच्या गळ्यात हार घालतांना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनीष आणि अश्रिताच्या लग्नात त्यांच्या कुटुंबियांमधील काही निवडक जवळचे लोक उपस्थित होते. या दोघांचं लग्न मुंबईमध्ये झालंय.
पांडेनं रविवारी आपल्या घरगुती कर्नाटकच्या टीमला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मिळवून दिली होती. या मॅचमध्ये पांडेनं तामिळनाडू विरोधात ६० रन्सची खेळी खेळली.
मनीष पांडेनं भारतासाठी आतापर्यंत २३ वनडे आंतरराष्ट्रीय आणि ३२ टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. मनीष पांडे आता वेस्टइंडिज विरोधात टी-२० सीरिजमध्ये खेळतांना दिसणार आहे.
मनीष पांडे मूळचा उत्तराखंडचा राहणारा आहे. त्याचा जन्म नैनीतालमध्ये १० सप्टेंबर १९८९ला झाला. मनीष पांडेच्या वडिलांना त्याला सैन्यात दाखल करायचं होतं. मात्र मनीषचं स्वप्न क्रिकेटपटू होण्याचं होतं.